Tuesday, September 26, 2023

ईपीएफओ सदस्यांनी काढले ३३६० कोटी

नवी दिल्ली: एम्प्लॉइज प्रोव्हिडंट फंड आॅर्गनायझेशन अर्थात ईपीएफओच्या १२ लाख सभासदांनी लॉकडाउनच्या आजवरच्या कालावधीत ३,३६० कोटी रुपयांचा निधी काढला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

ईपीएफओने २८ मार्चला कर्मचाºयांना देशव्यापी लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर ईपीएफओमधून काही प्रमाणात रक्कम काढण्यास मंजुरी दिली होती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कर्मचा-यांना काढून घेतलेली रक्कम परत जमा करावी लागणार नाही. करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चला देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली होती. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी केंद्र सरकारच्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजच्या पाचव्या टप्प्याची घोषणा करताना वरील माहिती दिली.

Read More  हे ठरले वैज्ञानिकाचे शेवटचे शब्द

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन महिन्यांत ईपीएफओच्या १२ लाख सदस्यांनी ३,३६० कोटी रुपयांचा निधी काढला आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाºया एम्प्लॉइज प्रोव्हिडंट फंड आॅर्गनायझेशनने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत १२ लाख दाव्यांचा निपटारा केला आहे.

ईपीएफओमधून काही विशेष अटींवर रक्कम काढून घेणे हा केंद्र सरकारच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा एक भाग आहे. त्या अंतर्गत सभासदांना तीन महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्त्याइतकी रक्कम ंिकवा संबंधिताच्या खात्यामध्ये एकूण जमा रकमेच्या ७५ टक्के रक्कम जी कमी असेल ती काढण्याचे अधिकार मिळाले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ही रक्कम त्यांना पुन्हा जमा करण्याची आवश्यकता भासणार नाही. तारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाउनच्या कालावधीत २.२ कोटी बांधकाम कामगारांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत ३,९५० कोटी रुपये देण्यात आले आहेत. तत्पर्ू्वी केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी सर्व राज्यांना ५२,००० कोटी रुपयांच्या बांधकाम उपकरातून ३.५ कोटी कामगारांना वित्तीय मदत देण्याविषयी बजावले होते.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या