नवी दिल्ली : उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर सर्व बँकांचे मिळून ४.५ लाख कोटी रुपयांचे अनुत्पादक कर्ज असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. ट्विटरवरुन त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी शुक्रवारी हे ट्विट केले आहे.अदानी समुहावर सध्या बँकांची ४.५ लाख कोटी रुपये एनपीए आहे. मी चुकीचा असेल तर त्यात सुधारणा करा. दुसरीकडे २०१६ पासून त्यांची संपत्ती दर २ वर्षांनी दुप्पट होत आहे. तरीही ते बँकांचे कर्ज का फेडत नाहीत? असा सवाल स्वामींनी केला आहे. गेल्या काही वर्षात अदानींनी ६ विमानतळे खरेदी केली आहेत. काही दिवसांनी ते ज्या बँकांचे कर्ज थकीत आहे त्यांनाही विकत घेतील, असा टोलाही स्वामींनी हाणला आहे.
अदानी समुहाकडून स्पष्टीकरण
स्वामींच्या आरोपांनंतर अदानी समुहाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अदानी समुहाचे रेकॉर्ड निष्कलंक आहे. ३ दशकात कंपनीचे एकही कर्ज एनपीए झालेले नाही. अदानी समुहावर केलेल्या आरोपांमधील आकडेवारी चुकीची आणि काल्पनिक आहे. कंपनी कर्ज न फेडण्याचे आरोप फेटाळते. कंपनी अस्तित्वात येऊन ३ दशक झाले आहेत. तेव्हापासून कंपनीचा इतिहास निष्कलंक आहे. एकाही बँकेचं कर्ज एनपीए होऊ दिलेले नाही, असे अदानी समुहाने म्हटले आहे.
काही धक्के; तर काही ठिकाणी बालेकिल्ले मजबूत