22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeउद्योगजगतएप्रिलमध्ये रोजगाराच्या ८८ लाख नव्या संधी

एप्रिलमध्ये रोजगाराच्या ८८ लाख नव्या संधी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना महामारीमध्ये अनेकांनी नोक-या गमावल्या. पण आता कोरोना हळूहळू नियंत्रणात आल्यानंतर २०२२ मध्ये नोकरीच्या संधी पुन्हा निर्माण होत आहेत. रोजगाराच्या संधी वाढत असल्याचेही दिसत आहे. एप्रिल २०२२ मध्ये देशात तब्बल ८८ लाख लोकांना रोजगार मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने ही आकडेवारी जारी केली आहे.

भारतात एप्रिलमध्ये नोकरीच्या संख्या ८८ लाखांनी वाढून ४३.७२ कोटी इतक्या नोक-या दिल्या गेल्याची माहिती सीएमआयईचे सीईओ महेश व्यास यांनी दिली आहे. मार्चअखेर देशात ४२.८४ कोटी जणांना नोकरी मिळाली होती. २०२१-२२ मध्ये देशातील श्रमशक्तीमध्ये सरासरी मासिक वाढ दोन लाख होती, असे देखील या अहवालात म्हटले आहे. रोजगारापासून वंचित राहिलेल्या कामगारांना पुन्हा काम मिळाल्यानंतर ही आकडेवारी सुधारेल, असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.

तज्ज्ञांकडूनही दुजोरा
हाताला काम नसणारे लोक पुन्हा एका नोकरीकडे वळले असल्याचे निरीक्षण या अहवालातून नोंदवण्यात आले आहे. ज्यांच्याकडे काम नव्हते, त्यांनी एप्रिल महिन्यात नोकरी करण्याला प्राधान्य दिले. दरम्यान, एका महिन्यात काम करणा-या वयाच्या लोकांची सरासरी वाढ दोन लाखापेक्षा जास्त असू शकत नाही. एप्रिल महिन्यात कामगार संख्या वाढण्याआधी त्यात घट नोंदवण्यात आली होती. कामगार संख्या ८८ लाखांनी वाढण्याआधी त्यात १.२ कोटी घट नोंदवण्यात आली होती. कामगारांची मागणी आणि त्यांचा पुरवठा सातत्याने बदलत राहतो. त्यामुळे ही आकडेवारीदेखील बदलत राहते असे व्यास यांनी म्हटले आहे.

एप्रिल महिन्यातील रोजगारात झालेली वाढ ही मुख्यत: उद्योग आणि सेवा क्षेत्रात नोंदवण्यात आली. उद्योगात ५५ लाख रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. तर सेवा क्षेत्रात ६७ लाख नोक-यांची भर पडली. गंभीर बाब म्हणजे या काळात कृषी क्षेत्रातील रोजगार ५२ लाखांनी कमी झाला.

मॉन्स्टर इंडियाने केलेल्या ऑनलाईन रोजगारांच्या अभ्यासातून याबाबतची मागणी किती वाढली, याचाही अभ्यास नोंदवण्यात आला. भारतात रोजगार भरतीत दरवर्षी १५ टक्के तर प्रत्येक महिन्यात ४ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या