24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeउद्योगजगतग्राहकांना सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी!

ग्राहकांना सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी!

एकमत ऑनलाईन

मुंबई : गणेशोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर आहे. आपल्या लाडक्या बाप्पासाठी तुम्हालाही सोन्या-चांदीची खरेदी करायची असेल तर ही उत्तम संधी आहे. कारण, मागच्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात काहीशी वाढ पाहायला मिळत होती. मात्र, आज सोन्याच्या दरासह चांदीचे दर देखील कमी झाले आहेत. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स ०.४० टक्क्यांनी घसरून २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,०१० रूपयांवर आला आहे. तर, १ किलो चांदीचा दर ५४,१२० रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे जर नेमके काय आहेत ते जाणून घ्या.

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या