21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeउद्योगजगतइस्रायलच्या बंदराचा ताबा आता अदाणींकडे

इस्रायलच्या बंदराचा ताबा आता अदाणींकडे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतातील आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदाणींनी इस्रायलच्या ‘हायफा’ बंदराचे टेंडर मिळवले आहे. त्यामुळे आता हायफा बंदराचं नियंत्रण अदाणीं ग्रुप ऑफ कंपनीला मिळाले आहे. इस्रायलच्या सरकारी मालकीचे असलेल्या बंदरांचे खासगीकरणाकडे पाऊल टाकत हे टेंडर काढण्यात आले. अदाणी ग्रुप ऑफ कंपनीजच्या अदाणी पोर्ट आणि इस्राईली कंपनी गॅडोट केमिकल बरोबर हे टेंडर मिळवले आहे.

इस्रायलमधील स्थानिक गुंतवणूकदार देखील ही डिल मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. पण जेव्हा त्यांना कळाले की गौतम अदाणी या डिलमध्ये असणार आहेत. तेव्हा त्यांनी माघार घेतल्याचे एका गुंतवणूकदाराने म्हटले आहे. अमेरिकेकडुन चीनवर या डीलमध्ये गुंतवणूक करु नये यासाठी मोठा दबाव होता. तसेच ऐनवेळेस इस्त्रायली गुंतवणूकदाराने माघार घेतल्याने उद्योगपती गौतम अदाणींनी हायफा बंदराचं टेंडर मिळवता आले. पुढील ३१ वर्ष आता हायफा बंदरावर अदाणींंचे नियंत्रण असणार आहे. १.१८ अब्ज डॉलरमध्ये हायफा बंदराचा करार झाला आहे. अदाणी कंपनीचा या बंदरावर ७० टक्के तर इस्राईली कंपनीचा ३० टक्के भागीदारी असणार आहे.

हायफा बंदर महत्वाचे
इस्रायलच्या तीन महत्वाच्या बंदरांपैकी हायफा बंदर महत्वाचे मानले जाते. खोल समुद्रातील हे हायफा बंदर व्यापारी आणि प्रवासी वाहतूक करणारी जहाजे देखील या बंदरावर येतात. उद्योगपती गौतम अदाणींनी या संदर्भात ट्विट करुन ही माहिती दिली आहे. यामुळे आशिया आणि युरोपात व्यापार वृद्धीमध्ये नक्कीच वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मागील आठवद्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी देखील इस्राईलला भेट दिली होती. त्याचाही या डीलवर प्रभाव असल्याचे बोलले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या