22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeउद्योगजगतअदानींच्या संपत्तीत २ लाख कोटींची वाढ

अदानींच्या संपत्तीत २ लाख कोटींची वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, रिलायन्स ग्रूपचे मालक मुकेश अंबानी यांच्याकडील संपत्तीत गौतम अदानींपेक्षा फारच कमी वाढ झाली आहे. २०२१ मध्ये अदानींच्या संपत्तीत झालेली वाढ पाहून डोळे दिपवणारी आहे.ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सवर उपलब्ध माहितीनुसार गौतम अदानी यांच्या संपत्तीत यंदाच्या वर्षात एकूण २९ अब्ज डॉलर (२ लाख कोटींहून अधिक) इतकी वाढ झाली आहे. अदानींच्या तुलनेत मुकेश अंबानींच्या संपत्तीत कमी वाढ झाल्याने दोघांमधील एकुण संपत्तीमधील फरक केवळ १२ अरब डॉलर (जवळपास २० हजार कोटी) इतकाच राहिला आहे.

गौतम अदानी ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्समध्ये १९ व्या स्थानावर आहेत. अदानींची एकूण संपत्ती ६२.७० अरब डॉलर इतकी आहे. २०२१ या वर्षात संपत्तीत सर्वाधिक वाढ होणा-या श्रीमंतांच्या यादीत अदानी दुस-या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे, यंदा संपत्ती वाढीच्या बाबतीत गौतम अदानी यांनी जेफ बेजोस, एनल मस्क, मार्क झुकरबर्ग, वॉरन बफेट, बिल गेट्स यांनाही मागे टाकले आहे. अदानींच्या पुढे केवळ फ्रान्सचे बिलेनियर बेर्नार्ड अर्नाट आहेत. त्यांच्या संपत्तीत ४२.३० अरब डॉलर्सने वाढ झाली आहे.

२०२०मध्ये अदानींची संपत्तीत ५०० टक्के वाढ
बिझनेस इनसायडरच्या अहवालानुसार २०२० या वर्षात अदानी यांच्या संपत्तीत तब्बल ५०० टक्क्यांनी वाढ झाली. गौतम अदानी सध्या देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि अदानी ग्रूपच्या एकूण सहा कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत. या सर्व कंपन्यांनी कोरोना काळात चांगली कामगिरी केली आहे. अदानींच्या सर्व कंपन्यांची एकूण किंमत ८० बिलियन डॉलरपेक्षाही अधिक आहे.

अर्जन नागवासवालाची अखेर भारतीय संघात निवड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या