22 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home उद्योगजगत अ‍ॅपलनंतर आता झूमचीही भारतात मोठी गुंतवणूक!

अ‍ॅपलनंतर आता झूमचीही भारतात मोठी गुंतवणूक!

एकमत ऑनलाईन

चीनला जबर झटका, हैदराबाद, बंगळुरूमध्ये नवे डेटा सेंटर सुरू होणार

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे चीनची प्रतिमा जगभरात खराब झाली आहे. अशातच भारतासोबत सीमेवरील कुरापतीमुळे त्यांच्याबद्दल नाराजी आहे. अनेक कंपन्या त्यांचे चीनमधील उत्पादन अन्य देशात नेण्याचा विचार करत आहेत. गेल्या काही दिवसांत अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी त्यांचा भारतातील व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली आहे. तसेच चीनमधील कंपन्याही भारताकडे आकर्षित होत आहेत. भारत-चीन तणावानंतर चीनमधील बºयाच कंपन्यांनी भारतात गुंतवणूक वाढविण्याची घोषणा केली आहे. त्यात अ‍ॅपलसारखी दिग्गज कंपनीदेखील भारतात येणार आहे. यासंबंधीची घोषणा होऊन दोन दिवस उलटले नाहीत, तोच आता झूम कंपनीनेही भारतात व्यवसाय वाढविण्याची घोषणा केली. त्यामुळे चीनला जबर झटका बसला आहे.

भारत-चीन सीमेवरील तणावानंतर दोन्ही देशांतील संबंध बिघडले आहेत. त्यातच चीनने इतर देशांशीही पंगा घेतला आहे. त्यामुळे अनेक देश चीनची कोंडी करण्यास पुढे सरसावले आहेत. त्यातच चीनमधील कंपन्यांची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या भारतानेही चीनची आर्थिक कोंडी करण्याचा निर्णय घेऊन चिनी कंपन्यांच्या अनेक निविदा रद्द केल्या आहेत. तसेच कंत्राटदेखील थांबविले आहे. एवढेच नव्हे, तर चिनी मालावरही बहिष्कार टाकला जात आहे. अशा परिस्थितीत अनेक चिनी कंपन्या चीन सरकारच्या भूमिकेवर नाराज असून, अनेक कंपन्या आता देश सोडून जात आहेत. त्यात बºयाच आघाडीच्या कंपन्यांनी भारताला पसंती देत येथे गुंतवणूक वाढविण्याची घोषणा केली आहे. त्यात कालच दिग्गज कंपनी अ‍ॅपलने टॉप मॉडेलचे भारतात उत्पादन सुरू केल्याची घोषणा केली होती. आता झूम कंपनीने भारतात व्यवसाय वाढवण्याची घोषणा केली आहे. झूमने या आठवड्यात या संदर्भात माहिती दिली. कंपनी भारतातील व्यवसाय तीन पट वाढवणार आहे.

हैदराबाद, बंगळुरूमध्ये डेटा सेंटर्स सुरू करणार
झूमने हैदराबाद आणि बंगळुरू येथे नवे डेटा सेंटर्स सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या दोन शहरात लवकरच दोन डेटा सेंटर्स सुरू होऊ शकतात. मात्र, कंपनीने भारतात किती कर्मचारी घेणार, हे अद्याप जाहीर केलेले नाहीे. पण हे मात्र निश्चित आहे की त्यांच्या या निर्णयामुळे देशात काही प्रमाणात रोजगाराच्या संधी तयार होऊ शकतात. त्याचा फायदा भारतीय तरुणांना होऊ शकेल.

झूम मूळ अमेरिकन कंपनी
झूम ही मूळ अमेरिकन कंपनी आहे. चीनसोबतचे संबंध बिघडत चालले आहेत. काही दिवसांपूर्वी डेटा चीनमधून येतो, यावरून वाद झाला होता. कंपनीचा डेटा चीनमधील सर्व्हरमध्ये राहतो. इतकेच नव्हे तर चीन सरकारच्या सांगण्यावरून झूम कंपनीने काही मानवाधिकार ग्रुप बंदी केली होती. झूमचे चीनमध्ये ७०० कर्मचारी आहेत.

भारतात झूमचे यूझर्स वाढले
जानेवारी ते एप्रिल या कालावधीत भारतात झूमचे फ्री युझर्स ६ हजार ७०० टक्क्यांनी वाढले आहेत. कोरोना काळात आॅनलाईन काम करणाºयांनी झूम अ‍ॅपचा वापर केला. झूमचा वापर डिसेंबरपर्यंत रोज १ कोटी लोक करत होते. हा आकडा आता एप्रिलमध्ये ३० कोटींवर पोहोचला आहे.

भारतात ७० कोटी इंटरनेट युजर्स
भारतात सध्या ७० कोटी इंटरनेट युझर्स आहेत आणि अद्याप ५० कोटी लोक इंटरनेटचा वापर करत नाहीत. हे लोक भविष्यात नेटचा वापर करू शकतात. देशात इंटरनेटचा वापर वाढत असल्याने झूमने व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More  बारावी गुणपत्रिकांचे महाविद्यालयातून होणार वितरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,406FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या