26.6 C
Latur
Monday, March 20, 2023
Homeउद्योगजगतएअर इंडियाचा एअरबसकडून वाढीव विमाने खरेदी करणार

एअर इंडियाचा एअरबसकडून वाढीव विमाने खरेदी करणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : एअर इंडिया ८४० विमाने खरेदी करणार आहे. ही एअर इंडियाच्या इतिहासातील सर्वात मोठा करार असणार आहे. टाटाच्या मालिकी एअर इंडिया अमेरिकेकडून ४७० बोईंग विमाने खरेदी करणार अशी माहिती, याआधी समोर आली होती. मात्र आता एअर इंडियाच्या अधिका-यांनी बोईंग विमानासंदर्भातील कराराबाबत मोठी अपडेट दिली आहे. यानुसार, एअर इंडिया एकूण ८४० एअरबस आणि बोईंग विमाने खरेदी करणार आहे. अमेरिका आणि एअर इंडिया यांच्यातील हा करार विमान कंपन्यांच्या इतिहासातील मोठा करार ठरणार आहे.

एअर इंडियाचे चीफ कमर्शियल आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर निपुण अग्रवाल यांनी एका लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटलं आहे की एअर इंडियाच्या कराराबद्दल संपूर्ण जगभरात उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता आम्ही कृतज्ञ आहोत. निपुण अग्रवाल यांनी पुढे सांगितलं आहे की, एअर इंडियाच्या विमान खरेदीचा नवीन करार हा सुमारे दोन वर्षांपूर्वी एअर इंडियाच्या खाजगीकरणापासून सुरू झालेल्या अद्भुत प्रवासाचा एक भाग आहे. येत्या दशकात एअर इंडियाने ४७० हलकी विमाने आणि ३७० विमाने खरेदी करण्यासाठी बोईंग आणि एअरबसशी करार केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आधी ४७० विमान कराराची बातमी
एअर इंडिया फ्रेंच आणि अमेरिकन कंपनी एअरबस आणि बोईंगकडून ४७० विमाने खरेदी करणार आहे, अशी बातमी १४ फेब्रुवारी रोजी समोर आली होती. यामध्ये २५० एअरबस विमानं आणि २२० बोईंग विमानांचा समावेश होता. तसेच या करारामध्ये अतिरिक्त ३७० विमाने खरेदी करण्याचा पर्याय आहे. या करारामुळे टाटाच्या मालकीच्या एअर इंडियाच्या ताफ्यात ४० पूर्ण आकाराची अ ३५० आणि २१० लहान आकाराची विमाने समाविष्ट होतील. यामध्ये एअरबस कंपनीच्या अ- ३२०/३२१, एनईओ/एक्सएलआर आणि अ ३५०-९००/१००० या विमानांचा समावेश आहे. याशिवाय, १९० ७३७-एमए, २० ७८७ आणि दहा ७७७ या बोईंग विमानांचा समावेश आहे. या करारानंतर एअर इंडियाच्या ताफ्यात बी ७३७-८०० विमानाचाही समावेश होईल.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या