34.4 C
Latur
Sunday, April 2, 2023
Homeउद्योगजगतअमूलचे दूध महागले

अमूलचे दूध महागले

एकमत ऑनलाईन

मुंबई : अर्थसंकल्पानंतर लगेचच जनतेला महागाईचा मोठा धक्का बसला आहे. अमूलने दुधाच्या दरात लिटरमागे तीन रुपयांनी वाढ केली आहे. दुधाच्या दरात प्रतिलिटर ३ रुपयांनी वाढ केल्याचे निवेदन अमूलने जारी केले आहे. दुधाचे वाढलेले दर आजपासून म्हणजेच ३ फेब्रुवारीपासूनच लागू होणार आहेत.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, आता अमूलचे ताजाचे अर्धा लिटर दूध २७ रुपयांना मिळणार आहे. तर १ लिटर पॅकेटसाठी ५४ रुपये मोजावे लागणार आहेत. अमूल गोल्ड अर्थात फुल क्रीम दुधाचे अर्धा किलोचे पॅकेट आता ३३ रुपयांना मिळणार आहे. तर १ लिटरसाठी ६६ रुपये मोजावे लागतील. अमूल गायीच्या एक लिटर दुधाचा दर ५६ रुपयांवर पोहोचला आहे. अर्ध्या लिटरसाठी २८ रुपये मोजावे लागणार आहेत. तर म्हशीचे ए२ दूध आता ७० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या