नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटकाळात अनेकांना पगारकपात सहन करावी लागली आहे तर अनेकांनी नोकरी गमावली आहे. अशावेळी तुम्ही जर बँकिंग क्षेत्रातील असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या अॅक्सिस बँकेत पुढील वर्षी एक हजार लोकांना रोजगार देण्यासाठी गिग अपॉर्च्यूनिटी या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाअंतर्गत कोणताही प्रतिभावान उमेदवार देशातील कोणत्याही भागामध्ये बँकेबरोबर काम करू शकतो. बँकेच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.
हे मॉडेल 2 पद्धतीने काम करेल- पहिला पूर्णवेळ स्थायी नोकरी आणि दुसरा असाइनमेंट आधारित विशिष्ट कालावधीपर्यंत मर्यादित असेल. अॅक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक (कॉर्पोरेट सेंटर) राजेश दहिया यांनी पीटीआय (भाषा)शी बोलताना सांगितले की, ‘आम्हाला वाटते की गिगमध्ये मोठ्या (नियमित) नोकर्या मिळतील. आम्हाला सामान्य नोकरीप्रमाणे प्रभावी बनवायचे आहे. पुढील एका वर्षात आम्ही या मॉडेलद्वारे 800-1,000 लोक काम यातून जोडणार आहोत आणि हा मी कमीतकमी आकडा सांगत आहे.’
ते म्हणाले, पूर्वी मानसिकता अशी होती की कामासाठी ऑफिसला यावे लागेल, परंतु आता घरून काम करण्याच्या (Work From Home) संकल्पनेने बर्याच गोष्टी बदलल्या आहेत. दहिया म्हणाले की, लोक घरातून काम करताना याआधी मागेपुढे पाहत असत, परंतु आता त्यांना याची सवय झाली आहे आणि ती खूप उपयुक्त असल्याचे सिद्ध होत आहे. ते म्हणाले की, देशभरातील तरुण, अनुभवी मध्यम पातळीवरील व्यावसायिक आणि महिलांसह चांगल्या प्रतिभेची माणसे बँकेकडून शोधण्यात येणार आहेत.
राज्यात आज 14 हजार नवीन कोरोनाच्या रूग्णांची नोंद