नवी दिल्ली : फ्युचर ग्रुपचा रिटेल बिजनेसमधील बिग ब्रँड म्हणून ओळख असलेला बिग बाजार आणि इतर काही कंपन्या आता सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ताब्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा रिलायन्स ग्रुपकडून करण्यात आली आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ने फ्युचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल बिझनेस तसेच लॉजिस्टिक अँड वेअरहाऊसिंग बिझनेस खरेदी केला आहे.
बिग बझार आणि रिलायन्स ग्रुप मध्ये 24713 कोटी रुपयांना ही डील झाली आहे. यामुळे बिग बझार, फूड बझार, ई-झोन आणि अन्य रिटेल व्यवसाय रिलायन्सच्या ताब्यात आले आहेत. रिलायन्स बिग बझार ताब्यात घेतल्यानंतर फ्युचर ग्रुप एंटरप्रायझेसमध्येही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स 1200 कोटी रुपये गुंतवणार आहे. तसेच 6.09 टक्के हिस्साही खरेदी करणार आहे. याशिव्या 400 कोटी रुपये इक्विटी वॉरंटच्या रुपात गुंतविणार आहे. यामुळे एकूण 7.05 टक्के हिस्सा हा रिलायन्सकडे राहणार आहे.
आम्ही छोट्या व्यापाऱ्यासह आमच्या सहकार्याच्या अनन्य मॉडेलने किरकोळ उद्योगाच्या विकासाची गती सुरू ठेवण्याची आशा करतो. आम्ही देशभरातील आमच्या ग्राहकांना मूल्य प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत असे रिलायन्स रिटेलचे संचालक ईशा अंबानी म्हणाल्या.
लातूर जिल्ह्यात आणखी तब्बल ३२४ रुग्ण वाढले; आणखी ७ बाधितांचा मृत्यू