37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeउद्योगजगतइन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठी घसरण

इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठी घसरण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील दुसरी मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसमध्ये सोमवारी मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. इन्फोसिसचा शेअर जवळपास ७ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. मागील दोन वर्षातील ही मोठी घसरण असल्याचे म्हटले जात आहे. इन्फोसिच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणी मागे कंपनीचा तिमाही निकाल प्रामुख्याने कारणीभूत असल्याची चर्चा आहे. आजच्या घसरणीमुळे इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांचे सुमारे ४० हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

चार दिवसांच्या सु्ट्टीनंतर शेअर बाजार पुन्हा सुरू झाला तेव्हा विक्रीचा सपाटा सुरू असल्याचे दिसून आले. इन्फोसिसचा तिमाही निकाल १३ एप्रिल रोजी शेअर बाजार बंद झाल्यानंतर जाहीर करण्यात आला. निकाल फारसा उत्साहवर्धक नसल्याची चर्चा होती. त्यानंतर आज शेअर दरात घसरण दिसून आली. त्याशिवाय मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कंपनी सोडून जात असल्याचे समोर आल्याने बाजार निराश असल्याचे म्हटले जात आहे.

बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा, इन्फोसिसचा शेअर सकाळी १६०५ रुपयांवर खुला झाला. त्यानंतर सात टक्क्यांनी घसरून हा शेअर १५९० रुपयांवर आला. सकाळी १०.५३ वाजता इन्फोसिसच्या शेअरची किंमत ७.२७ टक्क्यांच्या घसरणीसह १६२१.२५ रुपये इतकी झाली होती.

इन्फोसिसने मागील आठवड्यात तिमाही निकाल घोषित केला. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या नफ्यात १२ टक्क्यांची वाढ होऊन ५६८६ कोटी रुपये इतका झाला. तर, २०२०-२१ या आर्थिक वर्षात ५०७६ कोटी इतका नफा होता. तर, इन्फोसिस कंपनीचा महसूल या दरम्यान २२.७ टक्क्यांनी वाढून ३२,२७६ कोटी रुपये इतका झाला. कंपनीने शेअरधारकांना १६ रुपये प्रति शेअर इतका डिव्हीडंड देण्याची घोषणा केली आहे. याआधी कंपनीने 15 रुपयांचा अंतरीम डिव्हीडंड दिला आहे. याचाच अर्थ कंपनीने २०२१-२२ या वर्षात ३१ रुपये प्रति शेअर इतका डिव्हिडंड दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या