बाजारात तेजीचा ट्रेंड; निफ्टीने १० हजारांची पातळी ओलांडली

419

मुंबई : आजच्या व्यापारी सत्रात मेटल आणि बँकिंग स्टॉक्सनी २% ची वृद्धी घेतली. त्यामुळे बाजार सकारात्मक स्थितीत बंद झाला. निफ्टीने आज १० हजारांची पातळी ओलांडण्यात यश मिळवले. निफ्टीमध्ये २.१३% किंवा २१०.५० अंकांची वृद्धी होऊन तो १०,०९१ अंकांवर बंद झाला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स २.०९% किंवा ७००.१३ अंकांनी वाढून ३४.२०८.०५ अंकांवर स्थिरावल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले.

आजच्या सत्रात जवळपास ८६७ शेअर्सनी नफा कमावला तर ७०६ शेअर्सनी नुकसान अनुभवले. तसेच १३३ स्टॉक्सचे मूल्य बदलले नाही. बजाज फिनसर्व्ह (८.२२%), कोल इंडिया (६.३३%), झी एंटरटेनमेंट (५.२४%), बजाज फायनान्स (५.४८%), आणि वेदान्ता (४.७०%) हे मार्केटमधील टॉप गेनर्स ठरले. तर एशियन पेंट्स (०.३७%), एचयूएल (०.५४%), टीसीएस (०.५७%), बजाज ऑटो (०.३५%) आणि भारती एअरटेल (०.४४%) आजच्या व्यापारी सत्रातील टॉप निफ्टी लूझर्स ठरले. निफ्टी बँकेने ३ टक्क्यांची वृद्धी घेतली. अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँकेने वृद्धी दर्शवली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप हे अनुक्रमे १.०५% आणि १.४८% नी वाढले.

आजच्या व्यापारी सत्रात भारतीय रुपयाचे मूल्य घसरले. रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७६.१४ रुपयांवर व्यापार केला.अमेरिकेतील वाढत्या कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांमधील भावना कमकुवत दिसून आल्या. त्यामुळे युरोपियन स्टॉक्सच्या मूल्यात आज घसरण दिसून आली. एफटीएसई १०० च्या मूल्यात ०.०५% ची घसरण तर एफटीएसई एमआयबीच्या मूल्यात ०.१९% ची वाढ दिसून आली. अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असूनही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापुढे आणखी लॉकडाउन नसेल, अशी घोषणा केली. त्यामुळे नॅसडॅकचे शेअर मूल्य ०.१५% वाढले. तर निक्केई २२५ आणि हँगसेंग कंपनीचे शेअर्स अनुक्रमे ०.४५% आणि ०.०७% नी घसरले.

Read More  वेध : रिझर्व्ह बँक आणि सहकारी बँकिंग