मुंबई : भारतात दररोज देशातील सरकारी तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर पेट्रोल-डिझेलचे दर ठरवतात. ही किंमत राज्यानुसार बदलते कारण पेट्रोल आणि डिझेलवरील कर राज्यानुसार बदलतात. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत चढ-उतार सुरू आहेत.
कच्च्या तेलाच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ते त्याच्या जुन्या दरांवर स्थिर आहे आणि सध्या ते प्रति बॅरल ७७.२८ डॉलरवर आहे. तसेच, ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर ते प्रति बॅरल ८२.७० डॉलरवर पोहोचले आहे. आज देशभरात पेट्रोल-डिझेल जुन्या दराने विकले जात आहे.