21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeउद्योगजगतकार ग्राहकांना एअर बॅग पॉलिसीचा फटका बसणार!

कार ग्राहकांना एअर बॅग पॉलिसीचा फटका बसणार!

एकमत ऑनलाईन

४ एअर बॅगची किंमत ५,२०० रू. मग कंपनी ६० हजार का सांगते? नितीन गडकरींचा सवाल

नवी दिल्ली : सरकारच्या ‘एअरबॅग पॉलिसी’चा परिणाम छोट्या कारवर होऊ शकतो. प्रत्येक कारमध्ये ६ एअरबॅगच्या नियमामुळे मारुतीची परवडणारी हॅचबॅक सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर जाईल.

अल्टो, एस-प्रेसो, वॅगनआर, स्विफ्टसारख्या छोट्या बॅचबॅक बंद करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. छोट्या कारच्या बेस व्हेरियंटमध्ये ६ एअरबॅग्ज बसवल्यास त्यांची किंमत ६० हजारांनी वाढेल, असे मारुतीचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी म्हटले होते. आता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एअरबॅगची किंमत सांगितली आहे.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेच्या प्रश्नोत्तराच्या वेळी कारमधील एअरबॅगचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी विचारले होते की, सरकारने निर्णय घेतला आहे की, प्रत्येक कारमध्ये किमान ६ एअरबॅग अनिवार्य केल्या जातील. त्याच्या मसुदा, अधिसूचनेची तारीख यावर्षी ऑक्टोबरची आहे. परंतु, ती अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. त्याची अधिसूचना कधी येणार, जेणेकरून कंपन्या ‘एअरबॅग’चे धोरण लागू करू शकतील.

या प्रश्नावर नितीन गडकरी म्हणाले की, ‘एअर बॅगची किंमत फक्त ८०० रुपये आहे. सरकार ६ एअरबॅगच्या प्रस्तावावर विचार करीत आहे. त्याची अंमलबजावणीही लवकरच होणार आहे. कार कंपन्यांसाठी ते केव्हा बंधनकारक असेल याची टाइमलाइन त्यांनी स्पष्ट केली नाही.

देशात दरवर्षी पाच लाखांपर्यंत रस्ते अपघात होतात. ज्यामध्ये १.५ लाख लोकांचा जीव जातो. सध्या, कारमधील ड्रायव्हर आणि पुढच्या सीटच्या प्रवाशाला एअरबॅग आवश््यक आहे. मागे बसलेल्या लोकांसाठी एअरबॅगचा नियम नाही. मात्र, सरकारने सर्व प्रवाशांसाठी एअरबॅग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रती एअरबॅग १५ हजार का?
एका एअरबॅगची किंमत ८०० रुपये असताना कंपनी त्यासाठी १५ हजार रुपये का आकारत आहे? आरसी भार्गव यांच्या मते जर ६ एअरबॅग्ज बसवल्या गेल्या तर गाडीची किंमत ६० हजार रुपयांनी वाढेल. कारमध्ये आधीच २ एअरबॅग आहेत. म्हणजेच ४ एअरबॅग बसवण्याचा खर्च १५ हजार प्रति एअरबॅग या दराने ६० हजार असेल.

कंपनी ६० हजार का सांगतेय?
नितीन गडकरींच्या मते एअरबॅगची किंमत ८०० रुपये आहे. म्हणजेच ४ एअरबॅगची किंमत ३,२०० रुपये होते. आता असे गृहीत धरा की, एअरबॅगसह काही सेन्सर्स, सपोर्टिंग अ‍ॅक्सेसरीज देखील स्थापित केले जातील. मग एअरबॅगची किंमत सुमारे ४०० ते ५०० रुपयांपर्यंत वाढू शकते. म्हणजेच एअरबॅगची किंमत १,३०० रुपये असू शकते. अर्थात ४ एअरबॅगची किंमत ५,२०० रुपये भरते. मग कंपनी ६० हजार रुपये का सांगत आहे?

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या