35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home उद्योगजगत जानेवारीपासून युपीआय पेमेंटवर शुल्क आकारणी

जानेवारीपासून युपीआय पेमेंटवर शुल्क आकारणी

पेटीएमला वगळले ; थर्ड पार्टी अ‍ॅपद्वारे व्यवहाराला आणखी जादा शुल्क

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: नोटाबंदीनंतर ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने युपीआय ट्रान्झेक्शन सुरु करण्यात आल्या. तसेच त्याला मोफत चालू ठेवण्यात आले. मात्र १ जानेवारी २०२१ पासून चित्र बदलणार असून आता युपीआय ट्रांझॅक्शनवर शुल्क द्यावे लागणार आहे. तसेच थर्ड पार्टी अ‍ॅपद्वारे जर कोणी युपीआय ट्रांझॅक्शन करणार असेल तर त्याला जादा चार्ज द्यावा लागणार आहे.

नेशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) ने हा अतिरिक्त चार्ज लावण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर एनपीसीआइने थर्ड पार्टी ऍप प्रोव्हायडर्सकडून चालवण्यात येणा-या युपीआय पेमेंट सर्व्हिसमध्ये १ जानेवारी २०२१ पासून ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम लागू झाल्यानंतर गुगल पे, ऍमेझॉन पे, फोन पे सारख्या थर्ड पार्टी ऍप प्रोव्हायडर्सच्या ग्राहकांवर परिणाम होणार आहे. मात्र या नियमाचा परिणाम पेटीएमच्या ग्राहकांवर होणार नाही.
एकाधिकारशाही रोखण्यासाठी घेतला निर्णय

निर्णयाबाबत एनपीसीआयने सांगितले की, हा निर्णय भविष्यात कुठल्याही थर्ड पार्टी ऍपची एकाधिकारशाही रोखण्यासाठी आणि त्याला आकाराच्या मानाने मिळणारे विशेष फायदे थांबवण्यासाठी ही कारवाई केली आहे. एसपीसीआय च्या या निर्णयामुळे आता युपीआय ट्रांझॅक्शनमध्ये कुठल्याही पेंमेंट ऍपची एकाधिकारशाही राहणार नाही. ३० टक्के कॅप निर्धारित करण्यात आल्याने आता गुगल पे, ऍमेझॉन पे, फोनपे सारख्या कंपन्या यूपीआयअंतर्गत होणा-या एकूण ट्रान्झॅक्शनमध्ये कमाल ३० टक्के ट्रान्झॅक्शनचीच तरतूद करू शकतील.

युपीआय सेवेचे स्वरुप
यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (युपीआय) ही एक रियल टाइम पेमेंट सिस्टिम आहे. ती मोबाईल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पैसे अकाऊंटमध्ये त्वरित ट्रान्सफर करू शकते. यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही एका बँकेच्या अकाऊंटमधून त्वरित ट्रान्सफर करू शकता. यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही एका बँक अकाऊंटला अनेक यूपीआय ऍपशी लिंक करू शकता. तसेच अनेक बँक अकाऊंटना एका यूपीआय ऍपच्या माध्यमातून नियंत्रित करू शकता.

आंध्र प्रदेशात गुढ आजाराने २२८ जण अत्यवस्थ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या