दुसऱ्या ए.टी.एम.च्या मशीनवर त्यांची क्लोनिंग केल्याची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) ने म्हटले आहे की, दिल्लीमध्ये बँकेच्या क्लोन कार्ड वापरण्याचा घटना उघडकीस आल्या आहेत. बँक पीडित ग्राहकांना ही राशी परत करणार आहेत. SBI ने ट्विट करून म्हटले आहे की ग्राहकांनी आपल्या देण-घेण संबंधी माहिती आपल्या बँकेच्या मूळ शाखेत द्यायला हवी.
Read More लॉकडाऊन दरम्यान पूर्ण पगार देण्याचा आदेश केंद्र सरकारकडून मागे
क्लोनिंग केल्याची शक्यता
बँकेने म्हटले आहे की दिल्ली मध्ये क्लोन ए.टी.एम. कार्डांचा वापर करण्याची घटना उघडकीस आली आहेत. कुठल्या दुसऱ्या ए.टी.एम.च्या मशीनवर त्यांची क्लोनिंग केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.एस.बी.आय.च्या या ग्राहकांना मदत करण्यात येईल आणि त्यांना प्रक्रियेनुसार त्यांची राशी परत केली जाईल.
वेळोवेळी ए.टी.एम.च्या पिन ला बदलण्याचा सल्ला
बँकेने ग्राहकांना संरक्षणात्मक उपायांसाठी सतर्क केले आहे. त्याचबरोबर ग्राहकांना वेळोवेळी आपल्या ए.टी.एम.च्या पिन ला बदलण्याचा सल्लाही दिला आहे. ग्राहकांनी आपल्या वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस सारखे एटीएम पिन ठेवू नये, असा सल्ला देखील देण्यात आला आहे.