नवी दिल्ली : जागतिक बाजारात शनिवार दि. ११ फेब्रुवारी रोजी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. आज डब्ल्यूटीआय क्रूड १.६६ डॉलर म्हणजेच, २.१३ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७३.३९ डॉलरवर व्यापार करत आहे. दुसरीकडे, ब्रेंट क्रूड १.८९ डॉलर म्हणजेच, २.२४ टक्क्यांनी वाढून ७९.९४ डॉलरवर पोहोचले आहे. देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
देशात सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये विकले जात आहे. जिथे पेट्रोलचा दर ८४.१० रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ७९.७४ रुपये प्रति लिटर आहे. तर, राजस्थानमधील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वाधिक महाग पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. गंगानगरमध्ये पेट्रोल ११३.४८ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९८.२४ रुपये प्रति लिटर आहे. तर हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल ११२.५४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९७.३९ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.