नवी दिल्ली : भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर देशातील सरकारी तेल कंपन्या ठरवतात. दररोज सकाळी ६ वाजता राज्ये आणि शहरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे या किमती निश्चित केल्या जातात. बुधवारी म्हणजेच, ११ जानेवारी २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट नोंदवली गेली.
आज, डब्ल्यूटीआयक्रूड ऑईलची किंमत ०.५१ टक्क्यांनी घसरली आहे आणि ती प्रति बॅरल ७४.७४ डॉलरवर पोहोचली आहे. दुसरीकडे, ब्रेंट क्रूड ऑईलबद्दल बोलायचे झाले तर, त्याची किंमत ०.४७ टक्क्यांनी घसरली आहे आणि ती प्रति बॅरल ७९.७२ डॉलरवर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत आज भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम झाला आहे का? आज देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर जुन्याच दरावर आहेत. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.