नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जारी केलेल्या आकडेवारीनुसार कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बँकांकडून वितरित करण्यात आलेली कर्ज आणि ग्राहकांचे डिपॉझिट्स भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली चिन्हे मानली जात आहेत. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार २३ ऑक्टोबर रोजी संपलेल्या पंधरवड्यात बँकांच्या कर्जाचे पोर्टफोलिओ ५़०६ टक्क्यांनी वाढलेले आहेत. यासह बँकांचे कर्ज १०३़३९ लाख कोटी रुपयांवर पोचले आहे. या काळात बँकांचे डिपॉझिट्स १०.१२ टक्क्यांनी वाढून १४२.९२ कोटी रुपयांवर आलेले आहेत.
रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ९ ऑक्टोबर २०२० रोजी संपलेल्या पंधरवड्यात बँकांच्या कर्जात ५.६६ टक्के आणि ठेवींमध्ये १०.५५ टक्के वाढ झाली आहे, म्हणजे २३ ऑक्टोबर २०२० रोजीच्या दोन पंधरवड्यातील वाढ या तुलनेत थोडीशी कमी आहे. या आकडेवारीनुसार २५ ऑक्टोबर २०१९ रोजी संपलेल्या पंधरवड्यात बँकेचे कर्ज ९८.४० लाख कोटी रुपये होते. त्याच वेळी ठेवीची रक्कम १२९़७३ लाख कोटी रुपये होती. सप्टेंबर २०२० मध्ये नॉन-फूड बँक क्रेडिट ग्रोथ घसरून ८.८ टक्क्यांवर गेली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात ८.१ टक्के होती.
कर्जाचा दर ९़.१ टक्के
केंद्रीय बँकेच्या मते सप्टेंबर २०२० मध्ये इंडस्ट्रीज क्रेडिट मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, याचा अर्थ या क्षेत्रात क्रेडिट ग्रोथ शून्य झाली आहे. त्याचबरोबर सप्टेंबर २०१९ मध्ये उद्योगांना देण्यात आलेल्या कर्जात २़७ टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबर २०२० मध्ये सेवा क्षेत्रात कर्जाचा विकास दर ९़१ टक्के होता, जो मागील वर्षी याच महिन्यात ७.३ टक्के होता. सप्टेंबर २०१९ मधील १६.६ टक्के वाढीच्या तुलनेत या सप्टेंबर २०२० मध्ये वैयक्तिक कर्जात फक्त ९.२ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.