26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeउद्योगजगतकोरोनामुळे लिपस्टिकच्या मागणीत घट

कोरोनामुळे लिपस्टिकच्या मागणीत घट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली :कोरोनामुळे जीवनशैलीत खूप बदल घडून आले आहेत. नटण्या-मुरडण्याची सवय असणा-या महिलांमध्येही त्याचे पडसाद उमटत आहेत. बाहेर हिंडताना मास्क बंधनकारक असल्याने पुरुषांना आकर्षित करण्यासाठी महिलांना लिपस्टिकचा वापर प्रभावी वाटत नसून त्यांच्याकडून डोळ्यांचा मेकअपची मागणी वाढली आहे.

नुकत्याच झालेल्या सौंदर्यविषयक एका सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे. घराबाहेर पडताना आपल्याला मास्क लावणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळेच महिलांचे लिपस्टिक लावणे कमी झाले आहे. परिणामी एका अहवालानुसार लिपस्टिकची विक्री २८ टक्क्यांनी घटली आहे. त्याचवेळी डोळयांचा मेकअप, केसांचा रंग आणि नेलपेंटच्या विक्रीत २०० टक्के वाढ झाली आहे. कोरोनाच्या काळात महिला घरात होत्या. घरातूनच काम करत होत्या. त्यामुळे मेकअप करणे, लिपस्टिक लावणे कमी झाले होते. कोरोनाने वर्प फ्रॉम होमचा नवा ट्रेंड आणला आहे. ग्लोबल वर्कफोर्स अ‍ॅनालिटिक्सच्या सर्व्हेनुसार, २०२१ च्या अखेरपर्यंत २५ ते ३० टक्के लोक आठवड्यातील काही दिवस घरून काम करतील.

झी समूहावर आयकर विभागाचे छापे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या