नवी दिल्ली : भारताला गेल्यावर्षी कांदा परदेशातून आयात करावा लागला होता. यंदा हे चित्र बदलले असून, भारताकडून शेजारी देशांना कांदा निर्यात केला जात आहे. रब्बी हंगामातील कांदा बाजारपेठेत दाखल झाला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर कमी झाले आहेत. कांदा व्यापाºयांच्या अंदाजानुसार दोन लाख टन कांदा निर्यात केला जाऊ शकतो.
नवी दिल्लीमध्ये सोमवारी कांद्यांचे दर ७.५० रुपये ते २२.५० रुपयांच्या दरम्यान होते. महाराष्ट्रात कांद्याचा दर १३ ते १४ रुपयांपर्यंत होता. आझादपूर मार्केट पोटॅटो आॅनियन मर्चंट असोसिएशनचे महासचिव राजेंद्र शर्मा यांनी महिनाभरात कांद्याचे दर निम्म्यावर आल्याचे सांगितले आहे. कांद्याचे दर घटल्याने निर्यात वाढल्याचे राजेंद्र शर्मा यांनी सांगितले आहे.
दोन लाख टन कांदा निर्यातीची शक्यता
हॉर्टिकल्चर प्रोड्यूसर्स एक्सपोटर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित शाह यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना भारतातून कांद्याची निर्यात दोन लाख टनांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला. पुढील महिन्यात मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारकडून गतवर्षी कांदा निर्यातीवर बंदी
२०२० मध्ये भारतात कांद्याचे दर वाढल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्यात घेतला होता. १४ सप्टेंबर २०२० ला केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. सप्टेंबरपूर्वी भारत दर महिन्याला २.१८ लाख टन कांदा निर्यात करत होता. केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र तोमर यांनी संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. निर्यात बंदी हटवल्यानंतर जानेवारी महिन्यात ५६,००० टन फेब्रुवारी महिन्यात ३१,००० कांदा निर्यात करण्यात आली आहे.
२०२० मध्ये भारताने ६५, ५४६ टन कांद्याची आयात केली होती. भारत बांग्लादेश, श्रीलंका यासह इतर शेजारी देशांना कांदा निर्यात करतो. नाफेड महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांसह नव्याने तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्यांकडून कांदा खरेदी करणार आहे.
स्वपन दासगुप्ता यांचा राज्यसभेतून राजीनामा