25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeउद्योगजगतअर्थव्यवस्था संकटात; १५ क्षेत्रांना प्रचंड फटका बसणार

अर्थव्यवस्था संकटात; १५ क्षेत्रांना प्रचंड फटका बसणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : वृत्तसंस्था
कोरोनाचा विविध क्षेत्रांवर होणारा परिणाम डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स या अहवालात मांडण्यात आला आहे. या अहवालात प्रचंड परिणाम झालेले, माफक प्रमाणात परिणाम झालेले आणि सुक्ष्म परिणाम झालेले क्षेत्रांची मांडणी करण्यात आली आहे. एनबीएफसी, बँकिंग, रीटेल, टेक्सटाईल, आयटी, रीअल इस्टेट, आॅटो आणि मेटल्स या औद्योगिक क्षेत्रांवर मोठा परिणाम होणार आहे. टेलिकॉम, ऊर्जा, फार्मा आणि कृषी क्षेत्रावर सुक्ष्म परिणाम होतील. कन्झ्युमर स्टेपल, मीडिया, कन्झ्युमर ड्युरेबल्स इलेक्ट्रिकल्स, केमिकल्स आणि विमा या क्षेत्रांवर माफक परिणाम होतील, असे डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सने आपल्या अहवालात म्हटले आहे.

Read More  कोणतेही नवे वाहन खरेदी करु नका-मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

सध्याच्या परिस्थितीचा सकारात्मक परिणाम झालेले एक क्षेत्र म्हणून टेलिकॉम क्षेत्र उदयास येईल. या काळात जगभरात डेटा ट्रॅफिकमध्ये २०-३० टक्के वाढ झाली आहे. टेलिकॉम कंपन्यांच्या सबस्क्राइबरच्या वाढीत या काळात प्रचंड घसरण होण्याची शक्यता आहे. मात्र, सबस्क्राइबर्सकडून कंपनी बदलली जाण्याचे प्रमाणही कमी होईल. ऊर्जा क्षेत्रात, सर्वाधिक मागणीच्या काळात आणि बेस डिमांडमध्ये वीजेची मागणी २५-३० टक्क्यांनी घसरली.

Read More  वाशिममध्ये ‘कोरोना’चा पुन्हा शिरकाव

अत्यावश्यक सेवा म्हणून फार्मा क्षेत्रावर कोविड-१९ च्या या संकटाचा सगळ्यात कमी परिणाम झाला आहे. काही काळ खंडित झाल्यानंतर आता चीनमधून होणारा कच्च्या मालाचा पुरवठाही सुरळित झाला आहे आणि त्यामुळे महसुलावर फारसा परिणाम होणार नाही. यंदा पावसाचा अंदाजही चांगला असल्याने कृषी क्षेत्रावर सौम्य परिणाम होईल. खरिप मोसमात पाण्याची उपलब्धता आणि चांगला पाऊस होण्याची शक्यता यामुळे पुढेही शेतकºयांसाठी फायदाच होईल, असे या अहवालात म्हटले आहे.

Read More  उघडू शकतात शॉपिंग मॉल, सिनेमा हॉल

बँकिंग क्षेत्र हे उत्तम अर्थव्यवस्थेचे द्योतक आहे. या क्षेत्राला कर्जांची घटलेली प्रगती, रीटेल क्रेडिटमधील कर्ज बुडण्याचे वाढलेले परिणाम आणि नोटबंदी, जीएसटीनंतर काहीशा तणावातच असणा-या कॉर्पोरेट क्षेत्राकडून वसुली होण्यातील विलंब सहन करावा लागणार आहे. कर्ज देणाºया कंपन्यांमधील सर्व विभाग (पीएसयू बँका, खासगी बँका आणि एनबीएफसी) आता दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत एका ठराविक विचलनापेक्षा कमीवर ट्रेड करत आहेत. मागील १८ महिन्यांत एनबीएफसी/एचएफसी क्षेत्रात काही जणांना खेळत्या भांडवलाची समस्या पतदारीच्या समस्येत बदलताना पहावी लागत आहे आणि काहीजणांच्या बाबतीत व्यवसाय पद्धतीत धोरणात्मक बदल घडले आहेत. नजीकच्या काळात सोशल डिस्टंन्सिंगमुळे रीटेल क्षेत्राला जबरदस्त फटका बसणार आहे. विविध प्रकारच्या रीटेल व्यवसायांमध्ये सर्वाधिक परिणाम कपड्यांच्या व्यवसायावर होईल. त्यामागोमाग फूड रीटेलर (रेस्तराँ) वर परिणाम होईल.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या