30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeउद्योगजगतअर्थव्यवस्था ९.५ टक्क्यांनी घसरणार - रिझर्व्ह बँकेचा धक्कादायक खुलासा

अर्थव्यवस्था ९.५ टक्क्यांनी घसरणार – रिझर्व्ह बँकेचा धक्कादायक खुलासा

एकमत ऑनलाईन

मुंबई : आर्थिक वर्ष २०२१ मध्ये जीडीपीमध्ये ९.५ टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता, खुद्द रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवार दि़ ९ ऑक्टोबर रोजी येथे वर्तवली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत माहिती दिली.

यावेळी दास म्हणाले की, रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नसून ते ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात येणार आहेत़ तसेच, आगामी काळातही महागाई दर अपेक्षेपेक्षा अधिक राहणार असून, कोरोना महासाथीच्या संकटामुळे मागणीदेखील कमीच राहण्याची भीती रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेची बैठक २८ सप्टेंबर रोजी पार पडणार होती. परंतु गणसंख्येअभावी ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. कोरोना महासाथीच्या काळात अर्थव्यवस्था निर्णायक स्थितीत प्रवेश करत आहे. जीडीपी वाढीचा दर उणे ९.५ टक्के असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर सप्टेंबर महिन्यात पीएमआय वाढून ५६.९ झासा आहे. जानेवारी महिन्यानंतर तो सर्वाधिक आहे. याव्यतिरिक्त छोट्या कर्जदारांना ७.५ कोटी रूपयांच्या कर्जाला मंजूरी देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय रिझर्व्ह बँकेने गृहकर्जावरील रिस्क वॅटजेही कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या महासाथीमुळे अनेक गोष्टींवर मोठा परिणाम झाला आहे. परंतु आमची पुढे जाण्याची जिद्द कायम आहे. सध्या आव्हाने कायम आहेत. परंतु आपण त्यांना नक्कीच पार करू. आपण कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम दूर करून पुन्हा आर्थिक वृद्धीच्या मार्गावर जाऊ असा मला विश्वास आहे,असेही दास म्हणाले.

डिसेंबरपासून कोणत्याही वेळी आरटीजीएस ची मुभा
डिसेंबर २०२० पासून ग्राहकांना कोणत्याही वेळी आरटीजीएस सुविधेचाही वापर करता येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने केली.

व्याजदरात कोणताही बदल नाही
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. रेपो दर चार टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले असल्याने व्याजदरातही कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. याव्यतिरिक्त रिव्हर्स रेपो दरातही बदल करण्यात आलेले नाहीत.

चौथ्या तिमाहीत महागाई कमी होणार?
सुरू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहित जीडीपी वाढीचा दर सकारात्मक राहू शकतो. आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या चौथ्या तिमाहीत महागाई कमी होऊ शकते आणि रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्याच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे, असे दास म्हणाले.

पाकमध्ये टिकटॉकवर बंदी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या