नवी दिल्ली : आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी EPFO ने आर्थिक संकटात सापडलेल्या कंपन्यांना मोठी सूट दिली आहे. लॉकडाऊन काळात जर कंपन्यांना कर्मचाऱ्यांचा पीएफ भरता आला नाही तर त्यावर दंड आकारला जाणार नाहीय. कोरोनामुळे अनेक कंपन्यांना त्यांना कर्मचाऱ्यांचा पीएफ वेळेवर भरणे शक्य होणार नाही. ईपीएफओ कर्मचाऱ्यांचा पीएफ वेळेत जमा केला नाही तर दंड आकरते. मात्र, लॉकडाऊनमुळे जर कंपन्यांनी वेळेत पीएफ भरला नाही तर हा दंड माफ केला जाणार आहे. यामुळे कंपन्यांवर ताण येणार नाही, असे कामगार मंत्रालयाने जाहीर केले आहे.
Read More आमदार धिरज देशमुख शेतकऱ्यांच्या बांधावर
दरम्यान कोरोनाच्या संकटात कर्मचाऱ्यांच्या हाती पैसा असावा म्हणून केंद्र सरकारने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पीएफ काढण्याची मुभा दिली होती. तसेच बुधवारी अर्थमंत्र्यांनी कंपन्यांना पुढील तीन महिने १२ ऐवजी १० टक्के पीएफ भरण्याची सूट दिली होती. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा लॉकडाऊनचा काळ वाढत आहे. यामुळे कंपन्यांना नेहमीप्रमाणे काम करणे शक्य नाहीय. यामुळे ते पीएफ भरू शकत नाहीत, असे या पत्रकामध्ये म्हटले आहे. याचा ६.५ लाख कंपन्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच दंडाची रक्कम वाचणार आहे.
सध्या ४८ लाख कर्मचाऱ्यांचा पीएफ वेळेवर भरला जात आहे. ३० एप्रिलला EPFO ने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये महिन्याचे ईसीआर वेगळा काढण्यास सांगितले होते. याचा अर्थ कंपन्यांना ज्या कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसे भरण्याच्या तारखेनंतर द्यायचे आहेत, त्यांची माहिती EPFO ला द्यावी लागणार होती.