17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeउद्योगजगतफ्लीपकार्टच्या सहसंस्थापकांची उच्च न्यायालयात धाव

फ्लीपकार्टच्या सहसंस्थापकांची उच्च न्यायालयात धाव

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : फ्लीपकार्टचे सह-संस्थापक सचिन बन्सल यांनी ईडी कारवाईच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परकीय गुंतवणूक कायद्याचे उल्लंघन करून २३००० कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यासाठी ईडीने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर आता त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

ईडीने पाठवलेली नोटीस ही बेकायदेशीर आणि मनमानी कारभार असल्याचा आरोप बन्सल यांनी त्यांच्या याचिकेमध्ये केला आहे. त्यामुळे त्यांच्यासंबंधातील ही नोटीस रद्द ठरवावी अशी मागणी त्यांनी उच्च न्यायालयाला केली आहे. २०१८ मध्ये वॉल-मार्ट इंटरनॅशनलने कंपनी विकत घेतली. त्यानंतर मी कंपनीतून बाहेर पडलो. तेव्हापासून ई-कॉमर्समधील दिग्गजांशी माझे कुठलेही संबंध नाही, असा युक्तीवाद बन्सल यांनी केला आहे. दरम्यान, न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या एकल खंडपीठापुढे शुक्रवारी बन्सल यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने तीन आठवडे सुनावणीला स्थगिती दिली आणि ईडी तसेच, संबंधित अधिका-यांना काऊंटर दाखल करण्याचे निर्देश दिले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या