25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeउद्योगजगतसलग सातव्या महिन्यात GST कलेक्शनने ओलांडला १ लाख कोटी रुपयांचा आकडा

सलग सातव्या महिन्यात GST कलेक्शनने ओलांडला १ लाख कोटी रुपयांचा आकडा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशभर कोरोनाचा कहर वाढत आहे मात्र अशा परिस्थितीत देशासाठी एक सुखद बातमी आहे. वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून होणाऱ्या महसुलानं सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२१ मध्ये १४१३८४ कोटी रुपयांच्या जीएसटी कलेक्शन पैकी सीजीएसटी २७८३७ कोटी, एसजीएसटी ३५६२१ कोटी रुपये आणि आयजीएसटी ६८४८१ कोटी रुपये जमा केले. आयजीएसटीच्या ६८४८१ कोटींपैकी २९५९९ कोटी आयात केलेल्या वस्तूंमधून जमा झाले. त्याचबरोबर सरकारने ९४४५ कोटी रुपयांचा सेसही गोळा केला आहे. त्यापैकी ९३५ कोटी आयात वस्तूंवर उपकरातून वसूल करण्यात आले. मार्च २०२१ च्या तुलनेत १४% जास्त जीएसटी कलेक्शन झाले आहे.

आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या ७ महिन्यांत जीएसटी कलेक्शनमध्ये लक्षणीय घट झाली. मार्च २०२१ च्या तुलनेत एप्रिल २०२१ मध्ये जीएसटी महसूल १४ टक्क्यांनी वाढला. सरकारने एसजीएसटीमध्ये २२७५६ कोटी रुपये आणि सीजीएसटीमध्ये २९१८५ कोटी रुपयांचा सेटलमेंट केला. याशिवाय सरकारने आयजीएसटीची ५७०२२ कोटी रुपयांची सेटलमेंट केली तर एसजीएसटी ५८३७७ कोटी रुपये राहिला आहे.

लातूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत १९.१८ टक्के पाणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या