29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeउद्योगजगतविकास दरात आणखी घसरण

विकास दरात आणखी घसरण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसशी दोन हात करताना आर्थिक आघाड्यांवर घेतलेल्या निर्णयाने अर्थचक्राला चालना देण्यात केंद्र सरकारला काही प्रमाणात यश आले असले तरी दुस-या तिमाहीचे विकासदराचे आकडे चिंताजनक आहे. ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या दुस-या तिमाहीत विकास दर (जीडीपी) उणे ७.५ टक्के इतका राहिला आहे. तर एप्रिल ते जून या तिमाहीत जीडीपीने ऐतिहासिक उणे २३.९ टक्क्यांचा स्तर गाठला होता.

केंद्र सरकारकडून शुक्रवार दि़ २७ नोव्हेंबर रोजी दुस-या तिमाहीची आर्थिक आकडेवारी जाहीर करण्यात आली. ज्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत देशाचा जीडीपी उणे ७.५ टक्के इतका राहिला. त्याआधीच्या तिमाहीत तो उणे २३.९ टक्के होता. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ४.४ टक्के होता.

कोरोना रोखण्यासाठी देशात मार्चपासून तब्बल अडीच महिने कठोर टाळेबंदीची अंमलबजावणी करण्यात आली होती. उद्योगधंदे पूर्णपणे ठप्प होते. कोट्यवधी लोक बेरोजगार झाले. त्यामुळे एप्रिल ते जून या तिमाहीत विकास दराने ऐतिहासिक घसरण नोंदवली. स्वातंत्र्यानंतर प्रथमच विकासदर उणे २३.९ इतक्या नीचांकी पातळीवर गेला होता.

दरम्यान जूननंतर सरकारने मिशन बिगेनअंतर्गत अनलॉकची प्रक्रिया सुरु केली. पाच टप्प्यात बहुतांश सेवा पुन्हा सुरु करण्यात आल्या. अर्थचक्राने काहीअंशी वेग घेतला आणि जीडीपीमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले. मात्र सलग दोन तिमाहीत विकासदर उणे राहिल्याने अर्थव्यवस्था मंदीमध्ये गुरफटत असल्याची भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे.

देशात ८० टक्के लोक मास्क विना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या