34 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home उद्योगजगत वृत्तपत्र उद्योगांना प्रोत्साहन पॅकेज द्या

वृत्तपत्र उद्योगांना प्रोत्साहन पॅकेज द्या

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका लहान-मोठ्या सर्वच उद्योगांना बसला आहे. यातून वृत्तपत्र उद्योगही सुटलेला नाही. त्यामुळे वृत्तपत्र उद्योगाला सावरण्यासाठी प्रोत्साहन पॅकेज द्यावे, अशी मागणी ‘इंडियन न्यूजपेपर सोसायटी’चे (आयएनएस) अध्यक्ष एल. आदिमूलम यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

कोरोना साथरोगामुळे वृत्तपत्रांची विक्री आणि जाहिरातींवर गंभीर परिणाम झाल्याने वृत्तपत्र उद्योगाला अभूतपूर्व संकटाला तोंड द्यावे लागत असल्याकडे आदिमूलम यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. सरकारला पाठवलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या आठ महिन्यांमध्ये या उद्योगाचे सुमारे १२,५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, वार्षिक नुकसान जवळपास १६ हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटामुळे अनेक कंपन्यांना आपली वृत्तपत्रे बंद करावी लागली आहेतकिंवा काही आवृत्त्या अनिश्चित काळासाठी बंद कराव्या लागल्या आहेत. हीच परिस्थिती कायम राहिली, तर नजीकच्या काळात आणखी काही कंपन्यांना आपले काम थांबवणे भाग पडणार आहे.

कोरोनाचे काय झाले परिणाम?
– कोरोनाचा परिणाम या उद्योगातील पत्रकार, प्रिंटर्र्स, वृत्तपत्र विक्रेते तसेच अन्य अशा ३० लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर्मचारी-कामगारांवर देखील होऊ शकतो. या विनाशकारी संकटाचा प्रभाव लाखो नागरिकांवर पडू शकतो.
– त्यामध्ये वृत्तपत्र उद्योगातील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय, या उद्योगाशी निगडित अन्य उद्योग, प्रिंिटग प्रेस, वितरण पुरवठा साखळी, वृत्तपत्र विक्रेते तसेच घरोघरी वृत्तपत्र टाकणारे यांचा समावेश आहे.
– या आव्हानात्मक काळामध्ये सत्य व वस्तुनिष्ठ बातम्यांच्या प्रसारासाठी भारतीय वृत्तपत्र उद्योगाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, ज्याची दखल वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने देखील घेतली आहे, याकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
काय आहेत मागण्या?
– कागदावरील पाच टक्के राहिलेले सीमाशुल्क रद्द करून, दोन वर्षे करसवलत देऊन, सरकारी जाहिरातींच्या दरांमध्ये ५० टक्के वाढ करून तसेच मुद्रित माध्यमावरील सरकारी खर्चात २०० टक्के वाढ करून प्रोत्साहन पॅकेज द्यावे.
– केंद्र आणि राज्य सरकारकडील जाहिरातींची थकबाकी तातडीने निकाली काढणे ही काळाची गरज आहे, असे आदिमूलम यांनी म्हटले आहे.

शाळांमधील शिपाई, पहारेकरी आदी पदं रद्द होणार !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या