31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeउद्योगजगतसोन्याचे दर ६५ हजारांवर जाणार?

सोन्याचे दर ६५ हजारांवर जाणार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सोन्याची मागणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय बँकांची व्याज स्वस्त ठेवण्याची पॉलिसी आणि भारतातील सोन्याची मागणी पाहता या वर्षात चौथ्यांदा सोन्याची मागणी वाढली आहे, असे मोतीलाल ओस्वाल फायनान्स सर्व्हिसेसने म्हटले आहे. सोन्यात गुंतवणीकीसाठी चांगला पर्याय असल्याचे फर्मने म्हटले आहे़ गेल्या एक दशकात भारतात सोन्याने १५९ टक्के रिटर्न दिला. घरेलू शेअर निफ्टीने या दरम्यान ९३ टक्के रिटर्न दिले असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

सोन्याचा भाव मोठ्या अवधीत ६५-६७ हजार रुपये १० ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. सोन्याची मागणी तिसºया तिमाहीत ३० टक्के पडल्यानंतर चौथ्या तिमाहीत पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण यादरम्यान सोन्याच्या खरेदीमध्ये वाढ झाली आहे़ अमेरिकेतील निवडणुकीनंतर येणारे काही महिने सोन्याच्या किंमती ठरण्यासाठी महत्वपूर्ण असतील. यावेळी केंद्रीय बँकांची भूमिका, कमी व्याज दर, कोविड १९ प्रादुर्भाव आणि इतर घटनांचा सोन्याच्या किंमतींवर परिणाम होऊ शकतो.

रिपोर्टनुसार, केंद्रीय बँकांनी आपल्या अर्थव्यवस्थेला सहाय्य देण्यासाठी व्याज दरांमध्ये कपात केली आणि बाजारामध्ये पैशांचा प्रवाह वाढला आहे़ व्याजदर नकारात्मक दिशेने जाणार नाही पण निम्न स्तर २०२३ पर्यंत राहील असे अमेरिती फेड रिझर्वचे प्रमुख जेरॉम पावेल यांनी म्हटले आहे. सणांमुळे किरकोळ खरेदी मजबूत होईल अशी अपेक्षा आहे. भारतामध्ये सोन्याची मागणी तिस-या तिमाहीत ३० टक्क्यांनी कमी झाल्यानंतर चौथ्या तिमाहीत पुन्हा वाढण्याची शक्यता आहे, असे जागतिक सुवर्ण परिषद (डब्ल्यूजीसी) च्या अहवालात म्हटले आहे़

फ्रान्स नागरिकांनी चक्क मराठीत दिल्या शुभेच्छा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या