26.1 C
Latur
Tuesday, January 26, 2021
Home आंतरराष्ट्रीय आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीत तेजी

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीत तेजी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोमवारी सोन्याचा दर ८७७ रुपयांनी वाढून ५०६१९ रुपये प्रति १० ग्रॅम झालाा, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलीय. गेल्या व्यापार सत्रात सोन्याचा दर दहा ग्रॅम ४९,७४२ रुपयांवर बंद झाला होता. २०१२ रुपयांनी वाढून आज चांदीचा दरही ६९४५४ रुपये प्रति किलो झाला. मागील ट्रेडिंग सत्रात चांदीची किंमत प्रतिकिलो ६७,४४२ रुपये होती.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेजीमुळे सोन्याच्या वितरणाच्या दरातही वाढ दिसून आली. संध्याकाळी ७ वाजता एमसीएक्सवर फेब्रुवारी डिलिव्हरीचे सोने ९९४ रुपयांनी वाढले असून, ते प्रति दहा ग्रॅम ५१२३८ रुपयांच्या पातळीवर व्यापार करीत होते. त्याचप्रमाणे एप्रिल डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव ९७९ रुपयांनी वाढून ५१२७५ रुपयांवर होता, तर जून डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव ८९६ रुपयांनी वाढून ५१२४४ रुपयांवर होता.

चांदीची डिलिव्हरीही आज खूप वेगवान दिसत आहे. मार्च डिलिव्हरीच्या चांदीमध्ये सध्या एमसीएक्सवर २४७९ रुपयांची वाढ दिसून येत आहे. ती प्रति किलो ७०६०२ रुपयांच्या पातळीवर व्यापार करीत होती. यावेळी चांदीचा भाव २४६३ रुपयांनी वाढून ७१५३१ रुपयांच्या पातळीवर होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्यात प्रचंड वाढ झाली. इन्व्हेस्ंिटग डॉट कॉमच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, सायंकाळी ७ वाजता फेब्रुवारी महिन्यातील सोन्याचा भाव ५०.१५ तेजीसह प्रतिऔंस १९४५.५० डॉलर होता. त्याचप्रमाणे मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव यावेळी १.२८ डॉलरच्या तेजीसह प्रति औंस २७.६९ च्या पातळीवर व्यापार करत होता.

कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजाराखाली, मृत्यदरही घटला !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या