23.3 C
Latur
Saturday, August 8, 2020
Home उद्योगजगत गुगल भारतात करणार अब्जावधींची गुंतवणूक

गुगल भारतात करणार अब्जावधींची गुंतवणूक

मुंबई :तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातली आघाडीची कंपनी असलेली गुगल भारतात अब्जावधींची गुंतवणूक करणार आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्याबरोबर Video Conferencing द्वारे चर्चा केली आणि त्यांच्या या बैठकीनंतर लगेच दुपारी गुगलने भारतामध्ये 10 अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक असणार असल्याचं जाहीर केलं. सुंदर पिचाई यांनीच ही घोषणा केली. पंतप्रधानांबरोबर नेमकी कुठल्या विषयावर पिचाई यांनी चर्चा केली?

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या गुगल ने भारतासाठी आज मोठी आनंदाची बातमी दिली. Google For India अंतर्गत भारताच्या डिजिटायझेसनसाठी 10 अब्ज डॉलर गुंतवणूक होणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सकाळी चर्चा झाल्यानंतर गुगल तर्फे ही घोषणा करण्यात आली. Google for India Digitisation Fund ची घोषणा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी केली.

भारतातले तरुण, शेतकरी आणि उद्योजक यांचं आयुष्य तंत्रज्ञानाच्या मदतीने बदलू शकतं याबाबत पंतप्रधान मोदी यांची सुंदर पिचाई यांच्याशी चर्चा केली. COVID सारख्या महासाथीमुळे जगभरातलं आय़ुष्य बदललं आहे. काम करण्याची पद्धत, वर्क कल्चर या सगळ्यात फरक पडला आहे. त्याविषयीही चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदींनी Twitter वरून सांगितलं.

Read More  अरे देवा…बीड जिल्ह्यात 237 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

फक्त भारतामध्ये त्यांची 10 अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे.सुंदर पिचाई यांनी Google for India या कार्यक्रमाअंतर्गत पुढच्या काही वर्षांत भारतात मोठी गुंतवणूक होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. वेगवेगळ्या संस्थांमधली भागिदारी, इक्विटी , पायाभूत सुविधा आणि डिजिटायझेशनसाठीच्या इतर सोयींसाठी ही 10 अब्ज डॉलर्सची रक्कम फक्त भारतात खर्च होईल. पुढच्या पाच ते सात वर्षांत ही गुंतवणूक होईल, असंही सुंदर पिचाई यांनी सांगितलं. सुंदर पिचाई यांनी केलेल्या घोषणेतला महत्त्वाचा भाग असा की, भारताच्या डिजिटायझेशनमध्ये याचा फायदा होईल. शिवाय भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत माहिती आणि सेवा देण्यासाठी गुगल प्रयत्न करणार आहे. त्यामुळे भारतीय भाषांमधल्या माहितीसाठी या गुंतवणुकीचा उपयोग होईल. Google for India digitisation fund या अंतर्गत ही गुंतवणूक केली जाईल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,136FansLike
92FollowersFollow