27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeउद्योगजगतसरकारी बँकांचा उद्योगांना आधार

सरकारी बँकांचा उद्योगांना आधार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील सरकारी बँकांनी १ मार्च ते १५ मे या काळात विविध क्षेत्रांना ६.४५ लाख कोटी रुपये कर्जे मंजूर केली आहेत. सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग तसेच कृषी व रिटेल क्षेत्रांना ही कर्जे मंजूर करण्यात आली आहेत. कोविड-१९ संसर्गाच्या प्रभावाखाली आलेली ही क्षेत्रे असल्यामुळे या कर्जांमुळे या क्षेत्रांना मोठाच दिलासा मिळाला आहे. यापूर्वी ८ मेपर्यंत सरकारी बँकांनी ५.९५ लाख कोटी रुपयांची कर्जे मंजूर केली होती.

यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून सांगितले की, ही कर्जे एमएसएमई, रिटेल, कृषी व कॉर्पोरेट क्षेत्रांच्या एकूण ५४.९६ लाख खात्यांसाठी मंजूर करण्यात आली आहेत. याखेरीज, सरकारी बँकांनी आपत्कालीन पतपुरवठ्याच्या स्वरूपात १.०३ लाख कोटींची कर्जे २० मार्च ते १५ मे या काळात मंजूर केली आहेत.

Read More  8 राज्यांमध्ये हाय अलर्ट : पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरून पुढे सरकरणारं ‘अंम्फन चक्रीवादळ’

यापूर्वी ८ मेपर्यंत ६५ हजार ८७९ कोटी रुपयांची मदत बँकांनी मंजूर केली होती.
सरकारी बँकांनी एमएसएमई उद्योगांना पतपुरवठा करण्यासाठी तसेच कॉर्पोरेट कर्जदारांसाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपत्कालीन पतपुरवठा योजना सुरू केली होती. याअंतर्गत बँका कामकाज भांडवलाच्या १० टक्के रक्कम पतपुरवठा या स्वरूपातच देत आहेत. याखेरीज बँकांनी ३१ मेपर्यंत कर्जहप्ते लांबणीवर टाकण्याची मुभाही रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या