27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeउद्योगजगतचीनची १६०० कंपन्यांत १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

चीनची १६०० कंपन्यांत १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

एकमत ऑनलाईन

 स्टार्टअप कंपन्यांत ४ वर्षांत गुंतवला मोठ्या प्रमाणात पैसा

नवी दिल्ली : भारतामधील १६०० हून अधिक कंपन्यांमध्ये एप्रिल २०१६ ते मार्च २०२० दरम्यान चीनने एक अब्ज डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) केली आहे. सरकारनेच जारी केलेल्या आकडेवारीमधून ही माहिती समोर आली आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली.

भारतीय कंपन्यांत त्यातही स्टार्टअप कंपन्यांमध्ये चीनकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे, हा दावा खरा आहे का, असा प्रश्न सरकारला विचारण्यात आला होता. या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तर देताना भारतातील १६०० हून अधिक कंपन्यांमध्ये चिनी गुंतवणूक करण्यात आल्याचे म्हटले आहे. एप्रिल २०१६ पासून मार्च २०२० पर्यंत चीनने भारतीय कंपन्यांमध्ये १०२ कोटी अडीच लाख डॉलर्स (१.०२ अरब डॉलर्स म्हणजेच सात हजार कोटींहून अधिक रुपयांची) गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक एफडीआयच्या माध्यमातून करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. चीनने गुंतवणूक केलेल्या या १६०० कंपन्या ४६ वेगवेगळ््या क्षेत्रांमधील आहेत. यामध्ये वाहन उद्योग, पुस्तक छपाई, इलेक्ट्रॉनिक्स, सेवा आणि वीज उपकरणांच्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांना चीनमधून १० कोटी डॉलरपेक्षा अधिक निधी एफडीआयच्या माध्यमातून मिळाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आत्मनिर्भर भारत मोहीम सुरू केली आहे. देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी आणि इतर देशांमधून होणाºया आयातीवर निर्भर न राहण्याच्या उद्देशाने या मोहिमेअंतर्गत देशातील स्थानिक उत्पन्नांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्होकल फॉर लोकल म्हणजेच स्थानिक ब्रॅण्डच्या गोष्टी घेण्याला प्राधान्य देण्याची भूमिका घेतली. मात्र, प्रत्यक्षात चीनने भारतीय कंपन्यांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे मोदी सरकारवर चौफेर टीका होत आहे.

सर्वाधिक गुंतवणूक वाहन उद्योग क्षेत्रात
चीनकडून सर्वाधिक गुंतवणूक ही वाहन उद्योगाला मिळाली आहे. वाहन उद्योगाच्या माध्यमातून मागील ४ वर्षात चीनने भारतात १७.२ कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे, तर सेवा देणाºया क्षेत्रात (सर्व्हिसेस) चीनने १३ कोटी ९६ लाख ५० हजार डॉलरची गुंतवणूक केली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

सरकारने चीन बँकेकडून घेतले कर्ज
लडाखमधील चिनी सैन्यांच्या उपस्थितीबाबत विचारणा करताना आपले सरकार भारतीय लष्करासोबत आहे की चिनी लष्करासोबत, असा प्रश्न कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना टोला लगावत ‘आप क्रोनोलॉजी समझिए’ असे म्हटले आहे. मोदींनी चिनी लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडली नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर काही दिवसांनी केंद्र सरकारने चीनमधील बँकेकडून साडेपाच हजार कोटींचे कर्ज घेतल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. यावरून राहुल गांधींनी टीकास्त्र सोडले.

हा तर शहिदांचा अपमान
एप्रिल २०१६ ते मार्च २०२० दरम्यान चीनने भारतातील १६०० कंपन्यांमध्ये एक अब्ज डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. यावरून आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर हल्लाबोल केला असून, १५ जून रोजी चिनी सैनिकांबरोबर झालेल्या चकमकीत आपले २० जवान शहीद झाले. त्यानंतर चार दिवसांत १ जुलै रोजी चीनकडून ५ हजार ५२१ कोटी रुपये कर्ज घेतले. हा तर जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे, असा संताप व्यक्त केला आहे.

लज्जास्पद आहे कंगना रनौत -महाराष्ट्रातील पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या