24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeउद्योगजगतसलग आठव्यांदा १ लाख कोटींपेक्षा अधिक जीएसटी वसुली

सलग आठव्यांदा १ लाख कोटींपेक्षा अधिक जीएसटी वसुली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मे महिन्यात सरकारला १.०२ लाख कोटींचा जीएसटी मिळाला असून, एप्रिल महिन्यात १ लाख ४१ हजार ३८४ लाख कोटींचा जीएसटी मिळाला होता. देशात जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी आहे. दरम्यान, मे महिन्यातील वसुलीसह सलग आठव्या महिन्यात याची वसुली १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिली आहे.

अर्थमंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ग्रॉस जीएसटी रेवेन्यू कलेक्शन १,०२,७०९ कोटी रुपये आहे. यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा म्हणजे सीजीएसटी १७ हजार ५९२ कोटी रुपये, तर राज्यांचा हिस्सा म्हणजे एसजीएसटी २२ हजार ६५३ कोटी रुपये राहिला आहे. तर, आयजीएसटी ५३ हजार १९९ कोटी रुपये आहे. सेसच्या रूपात ९ हजार २६५ कोटी रुपये मिळाले आहेत. यामध्ये ८६८ कोटी रुपये वस्तूंची आयातीतून मिळाले आहेत.

कोरोनाच्या दुस-या लाटेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२०-२१ या वर्षातील जीडीपी आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार जीडीपीत ७.३ टक्क्यांची घट दिसून आली आहे. चार दशकातील सर्वात मोठी घट असल्याची नोंद झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही घट ४ टक्के होती. यापूर्वी १९७९-८०मध्ये ग्रोथ रेट -५.३ टक्के नोंदवला गेला होता. तेव्हा देशात दुष्काळजन्य स्थिती होती. तसेच कच्च्या तेलाचे भावही दुप्पट झाले होते.

मोदी सीमावाद सोडवण्यास सक्षम; पुतिन यांना विश्वास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या