नवी दिल्ली, 21 मे : कोरोना व्हायरसमुळे कंपन्यांना महसुलात मोठी तूट सहन करावी लागत आहे. अनेक कंपन्यांनी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केले आहे. आणि काही कर्मचाऱ्यांचे पगार कमी केले आहेत. मात्र अशा परिस्थितीतही एचसीएल टॅक्नॉलॉजीने आपल्या दीड लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनात घट केली नाही. याशिवाय गेल्या वर्षीचा बोनसही देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे कंपनीवर परिणाम झाला असला तरी ते कंपनीच्या एकही कर्मचाऱ्याला कमी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Read More मुंबईतील ३००० रुग्णवाहिका अचानक गायब-किरिट सोमय्या
कोरोना संकटामुळे कंपनीचा एकही प्रकल्प रद्द करण्यात आलेला नाही
सॉफ्टवेअर सेवा उपलब्ध करणारी देशातील तिसरी सर्वात मोठी कंपनी एचसीएल टॅक्नॉलॉजीने यापूर्वी 15000 फ्रेशर्संना नोकरी देण्याची ऑफर दिली आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये आलेल्या बातमीनुसार कोरोना संकटामुळे कंपनीचा एकही प्रकल्प रद्द करण्यात आलेला नाही. मात्र नवीन प्रकल्पांचे काम धीम्या गतीने सुरू आहेत.
कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे काही टक्के कामं सुरू आहेत. त्यामुळे कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. मात्र एचसीएल सारख्या कंपनीने कर्मचाऱ्यांनी न काढता त्यांना बोनस देणार असल्याचे सांगितले आहे.