नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एचडीएफसी बँकेने ही माहिती स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिली आहे. खरे तर, एचजीएफसी बँक सबसिडीरी जनरल लेजरमध्ये अनिवार्य किमान भांडवल राखण्यात अयशस्वी ठरली, त्यानंतर एसजीएल बाउंस झाला. आरबीआयने एचडीएफसी बँकेला ९ डिसेंबर रोजी आदेश दिला होता आणि दुर्सया दिवशी म्हणजे १० डिसेंबर रोजी हा खुलासा झाला आहे.
आरबीआयने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, एचडीएफसीने एसजीएच्या बाऊन्ससाठी १० लाख रुपये आर्थिक दंड आकारला आहे. १९ नोव्हेंबर रोजी बँकेच्या सीएसजीएल अकाउंटमध्ये काही सिक्युरिटीजमधील शिल्लक कमी झाली. आरबीआयच्या या आदेशानंतर एचडीएफसी बँकेचे शेअर्स शुक्रवारी १,३८४.०५ रुपयांवर व्यापार करताना दिसले.
डिजिटल लाँचिंगवर बंदी
नुकत्याच आरबीआयने आपल्या प्रोग्राम डिजिटल २.० अंतर्गत बँकेच्या डिजिटल बिजनेस जनरेटिंग ऍक्टिव्हिटीज सुरू करण्यावर बंदी आणली आहे आणि ग्राहकांसाठी नवीन नवीन क्रेडिट कार्डचे सोर्सिंग करण्याला प्रतिबंधित केल्याच्या घोषणेनंतर शेअरच्या मूल्यांकनात घट झाली आहे.
१४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल