34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeउद्योगजगतमार्चमध्ये जीएसटीची उच्चांकी वसुली

मार्चमध्ये जीएसटीची उच्चांकी वसुली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जीएसटी करवसुलीचा नवा विक्रम सरत्या मार्च महिन्यात नोंदवला गेला आहे. मार्च महिन्यात १ लाख २३ हजार ९०२ कोटी रुपयांची करवसुली झाली असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाकडून गुरुवारी देण्यात आली. कोरोना संकट काळातून अर्थव्यवस्था हळूहळू बाहेर पडत असल्याचे हे द्योतक असल्याचे आर्थिक क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात आले आहे.

गेल्यावर्षी कोरोना संकट आणि लॉकडाउनचा जबरदस्त फटका अर्थव्यवस्थेला बसला होता. याच्या परिणामी जीएसटी करवसुली १ लाख कोटी रुपयांच्या खाली गेली होती. ऑक्टोबर २०२० मध्ये करवसुली १ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली होती. तेव्हापासून सलग सहाव्या महिन्यात करवसुली एक लाख कोटी रुपयांच्या पुढे राहिलेली आहे.

मार्च महिन्यात १ लाख २३ हजार ९०२ कोटी रुपयांची जीएसटी करवसुली झाली. जीएसटी लागू झाल्यापासूनचा हा सर्वाधिक आकडा आहे. मार्चमध्ये केंद्रीय जीएसटीच्या (सीजीएसटी) माध्यमातून सरकारला २२ हजार ९७३ कोटी रुपये प्राप्त झाले. राज्य जीएसटीच्या (एसजीएसटी) माध्यमातून २९ हजार ३२९ कोटी रुपये तर एकीकृत जीएसटीच्या (आईजीएसटी) माध्यमातून ६२ हजार ८४२ कोटी रुपये प्राप्त झाले. याशिवाय उपकरांच्या माध्यमातून ८ हजार ७५७ कोटी रुपये प्राप्त झाले. गेल्या सात महिन्यांचा विचार केला तर सप्टेंबर २०२० मध्ये ९५ हजार ४८० कोटी रुपयांची जीएसटी करवसूली झाली होती.

ऑक्टोबर २०२० मध्ये हा आकडा १ लाख ५ हजार १५५ वर गेला. नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२० मध्ये क्रमश १ लाख ४ हजार ९६३ कोटी व १ लाख १५ हजार १७४ कोटींची करवसुली झाली. चालुवर्षी जानेवारी महिन्यात १ लाख १९ हजार ८४७ कोटींची तर फेब्रुवारी महिन्यात १ लाख १३ हजार १४३ कोटी रुपयांची करवसुली झाली होती.

रजनीकांतसंदर्भातील प्रश्नावरुन जावडेकर भडकले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या