22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeउद्योगजगतबॅंकाकडून अधिक व्याजदराच्या ठेव योजना

बॅंकाकडून अधिक व्याजदराच्या ठेव योजना

एकमत ऑनलाईन

मुंबई- केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक व्याजदराची निवृत्तीवेतन योजना चालू केली आहे. त्याचबरोबर बॅंकाही ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर अधिक व्याज उपलब्ध करण्याच्या योजना सुरू करीत आहेत.

खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बॅंकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.80 टक्के अधिक व्याजदर देणाऱ्या ठेवींची योजना उपलब्ध केली आहे. या अगोदर या बॅंकेकडून जेष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक व्याजदर उपलब्ध करण्याची योजना सुरू हाती. गेल्या एक वर्षापासून बॅंका सर्वसाधारणपणे कर्जाबरोबरच ठेवीवरील व्याजाचे दर कमी करीत आहेत. करोना व्हायरस निर्माण झाल्यानंतर ठेवीवरील व्याज दरात आणखी घट होत आहे.

Read More  औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 1200 च्या पार

अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून बॅंका पुढाकार घेत आहेत. या अगोदरच स्टेट बॅंक आणि एचडीएफसी बॅंकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक व्याजदर ठेवीवर उपलब्ध केले आहेत. आयसीआयसीआय बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 5 ते 10 वर्ष मुदतीच्या 2 कोटी रुपयाखालील ठेवीवर ज्येष्ठ नागरिकांना 6.55 टक्के व्याज उपलब्ध होईल.

ही योजना मर्यादित काळासाठी म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत उपलब्ध राहणार आहे. बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना व्याजाचा आधार असतो याची आम्हाला जाणीव आहे. सध्याच्या परिस्थितीत या नागरिकांचा आदर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही योजना सुरू केली असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या