26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeउद्योगजगतएका दिवसात सोन्याच्या दरात २००० तर चांदीच्या दरात ६००० रूपयांची घरसण

एका दिवसात सोन्याच्या दरात २००० तर चांदीच्या दरात ६००० रूपयांची घरसण

एकमत ऑनलाईन

मुंबई : शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठया प्रमाणात घट झाली. जागतिक बाजारपेठेत झालेल्या सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही जाणवला. एमसीएक्सवर फेब्रुवारी महिन्यातील वायदा दरात ४ टक्क्यांची म्हणजेच २,०५० रूपयांची घसरण होऊन दर ४८,८१८ रूपये प्रति १० ग्राम इतके झाले. तर चांदीच्या दरातही ६,१०० रूपयांची म्हणजे ८.८ टक्क्यांची मोठी घसरण होऊन ते ६३,८५० रूपये प्रति किलोवर पोहोचले. जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरात ४ टक्क्यांची घट होऊन ते १,८३३.८३ डॉलर्स प्रति औंसवर पोहोचले.

जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. अमेरिकन डॉलरचं वाढलेलं मूल्य आणि बॉन्ड यील्डमधील तेजीमुळे सोनच्या दरात घरसण झाल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकन सीनेटवरील डेमोक्रेडच्या नियंत्रणानं मोठ्या प्रोत्साहनपर उपाययोजनांची शक्यता वाढली आहे. तसंच बॉन्ड यील्डही मार्च महिन्यापासून आपल्या १० वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचला आहे. शुक्रवारी अमेरिकेत सोन्याचे दर हे १,९०० डॉलर्स प्रति औंसरपेक्षाही अधिक घसरल्याचं पाहायला मिळालं.

 

कोरोना लस घेतलेल्या समाजसेवकाचा ९ दिवसांनी मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या