मुंबई : प्रसार माध्यमातील झी समूहाच्या मुंबईतील कार्यालयांवर आयकर विभागाने सोमवारी धाडी टाकल्या आहेत. कर चुकवेगिरीच्या संशयावरुन झी समूहाशी संबंधित जवळपास १५ ठिकाणी आयकर विभागाकडून तपास मोहीम सुरु असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आज सकाळी मुंबईतील झीच्या कार्यालयांमध्ये आयकर विभागाच्या पथकाने तपासणी सुरु केली आहे. वस्तू आणि सेवा कर विभागाच्या माहितीच्या आधारे आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.
झी समूहाने जीएसटी कर चुकवल्याचा संशय आयकर विभागाने व्यक्त केला आहे. बनावट बिलांच्या आधारे जीएसटी कर बुडवल्याचा संशय आयकर विभागाने व्यक्त केला आहे. लोअर परळ आणि वरळी येथील झी कार्यालयात सकाळी ११ वाजता आयकर विभागाच्या तपास पथकाने धाड टाकली. दरम्यान आयकर विभागाच्या या कारवाईबाबत झी समूहाने स्पष्टीकरण दिले आहे. ही धाड नसून सर्व्हे आहे तसेच आयकर अधिका-यांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे झी समूहाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
उद्योजक सुभाष चंद्रा झी समूहाचे प्रमुख
उद्योजक सुभाष चंद्रा झी समूहाचे प्रमुख आहेत. जवळपास १९० बाजारपेठांमध्ये झी समूहाच्या सेवा सुरु आहेत. सहा महिन्यापूर्वीच राहुल जोहरी यांच्याकडे झी समूहाच्या फेररचनेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. माध्यम क्षेत्रातील सर्वात फायदेशीर आणि यशस्वी कंपनी करण्यासाठी मागील सहा महिन्यांमध्ये कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनात मोठे फेरबदल करण्यात आले. विशेषत: डिजिटलमधील संधी आणि नव्या क्षेत्रात विस्तार केला जाणार आहे.
कोरोनापेक्षाही भयंकर विषाणू संसर्गाचा इशारा