मुंबई : भारत बाँड ईटीएफच्या दुसºया टप्प्यातील दोन मालिका येत्या जुलै महिन्यात सादर करण्यात येणार असल्याचे एडलविस अॅसेट मॅनेजमेंटतर्फे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. या माध्यमातून १४ हजार कोटी रुपये खुल्या बाजारातून मिळवण्याची योजना आहे. या दोन मालिकांची मुदत एप्रिल २०२५ आणि एप्रिल २०३१ मध्ये संपणार आहे.
Read More हे ठरले वैज्ञानिकाचे शेवटचे शब्द
एडलविसने दिलेल्या माहितीनुसार या मालिकेच्या माध्यमातून बाजारातून येणारÞ्या मागणीच्या आधारावर ११,००० कोटी रुपये अतिरिक्त जमा करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या माध्यमातून गोळा करण्यात येणारी रक्कम ३००० कोटी रुपये असणार आहे. मात्र, गुंतवणूकदारांकडून अधिक मागणी आल्यास एकूण रक्कम १४ हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. एडलविस म्युच्युअल फंडाच्या सीईओ राधिका गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार या गुंतवणुकीमध्ये गुंतवणूकदारांना विविधा वेळी आपल्या गुंतवणुकीच्या गरजेनुसार विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत. अशाप्रकारच्या मॅच्युरिटीजसह ज्या गुंतवणूकदारांकडे डीमॅट अकाउंट नाही, त्यांच्यासाठी भारत बाँड फंड्स आॅफ फंड्सही सादर करणार आहे.