Thursday, September 28, 2023

JIOचा करार : General Atlantic करणार 6,598.38 कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली, 16 मे : चार आठवड्यांच्या कालावधीमध्ये जिओ प्लॅटफॉर्मध्ये एकूण 4 विदेशी कंपन्यांची गुंतवणूक होत आहे. फेसबुक, सिल्व्हर लेक, विस्टा इक्विटी यानंतर आता जनरल अटलँटिक (General Atlantic – GA) ही न्यूयॉर्कमधील खाजगी इक्विटी फंड कंपनी रिलायन्स इंडस्टीजच्या (RIL) टेलिकॉम कंपनी जिओमध्ये (JIO) गुंतवणूक करणार आहे. General Atlantic जिओमध्ये 6,598.38 कोटी गुंतवणूक करणार आहेत. जीएची ही आशियामधील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. यानंतर 4 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत जिओ प्लॅटफॉर्मधील गुंतवणूक 67,194.75 कोटींनी वाढली आहे. विशेष म्हणजे जिओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या या चारही कंपन्या त्यांच्या सेक्टरमधील दिग्गज कंपन्या आहेत.

Read More  विस्टा इक्विटी पार्टनर्स – रिलायन्सच्या जिओ : तब्बल ११,३६७ कोटीची गुंतवणूक

या गुंतवणुकीमुळे जिओचे इक्विटी मूल्य 4.16 लाख कोटी तर एंटरप्राइझ मूल्य 5.16 लाख कोटी इतके झाले आहे. जनरल अटलँटिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिल फोर्ड असे म्हणाले की, ‘जागतिक तंत्रज्ञानाचे दीर्घकालीन समर्थक आणि दूरदर्शी उद्योजक म्हणून आम्ही जिओमध्ये गुंतवणूक करणयास अत्यंत उत्साही आहोत. मुकेश अंबानी यांना खात्री आहे की, डिजीटल कनेक्टिव्हिटीमध्ये अशी क्षमता आहे की ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.’

जगभरातील अग्रगण्य गुंतवणूकदारांमुळे जिओला डिजिटल सोसायटीच्या दृष्टीने भारतामध्ये एक इकोसिस्टिमची पातळी वाढवण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया आरआयएलने दिली आहे.कंपनीकडून असे सांगण्यात आले आहे की, ही गुंतवणूक जिओला नेक्स्ट जनरेशन सॉफ्टवेअर प्रोडक्ट आणि प्लॅटफॉर्म कंपनी म्हणून विकास करण्यास मदत करेल. तसंच यातून जिओची तंत्रक्षमता आणि कोव्हिड-19 च्या परिस्थितीत आणि त्यानंतरही एक बिझनेस मॉडेल म्हणून समर्थन होत आहे. त्याचप्रमाणे यामुळे जिओ प्लॅटफॉर्मकडे असणारे भारतीय बाजारपेठेचे सखोल ज्ञान, COVID-19 नंतर वाढणारी डिजीटायझेशनची संधी आणि AI, Blockchain, AR/VR, Big data यांसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साधनं आणण्याची क्षमता गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत, असं कंपनीने त्यांच्या प्रेस रीलिजमध्ये म्हटले आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या