34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeउद्योगजगतबँकेची कामे करण्यासाठी फक्त 3 दिवस; 'पुढचे 8 दिवस बँक राहणार बंद

बँकेची कामे करण्यासाठी फक्त 3 दिवस; ‘पुढचे 8 दिवस बँक राहणार बंद

एकमत ऑनलाईन

मुंबई : २०२१ चे आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता फक्त ६ दिवस बाकी आहेत. अशी अनेक कामे आहेत ज्या पीपीएफ खात्यात किमान वार्षिक गुंतवणूक, सुकन्या समृद्धि योजना यासह 31 मार्चपर्यंत सामोरे जाणे आवश्यक आहे. त्याच वेळी, नवीन आर्थिक वर्षात अशी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली जातात, त्यासाठी बँकेत जाणे आवश्यक आहे. बँक संबंधित महत्त्वाच्या कामांसाठी तुमच्याकडे कमी दिवस असणार आहेत.

देशभरात महिन्याच्या दुसर्‍या आणि शेवटच्या शनिवारी बँका बंद आहेत. २७ तारखेला शेवटचा शनिवार असल्यानं बँका बंद राहतील. २८ तारखेला रविवार आहे, या दिवशी साप्ताहिक सुट्टी आहे. २९ तारखेला धुलीवंदन आहे. त्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद राहतील म्हणून बँकांचे आर्थिक व्यवहार लवकरात लवकर करून घ्यावे.

३१ मार्च आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी कोणतेही सार्वजनिक व्यवहार केले जाणार नाही. १ एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस असल्यानं बँक खाते बंद करण्याची धावपळ असणार आहे. २ एप्रिलला गुड फ्रायडेमुळे बँका बंद असतील. ३ एप्रिल रोजी बँक खुल्या असतील, आणि ४ एप्रिलला रविवारी सुट्टीमुळे बँका बंद राहतील.

एन.व्ही.रमण होणार नवे सरन्यायाधीश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या