मुंबई : नव्या वर्षाचे बजेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारीला मांडणार आहेत. कोरोना काळात वर्क फ्रॉम होम करणारा नोकरदार वर्ग, अभ्यास ते परीक्षा घरुन देणा-या विद्यार्थ्यांपासून व्यावसायिक, शेतकरी या साºयांनाच बजेटकडून अपेक्षा आहेत. कोरोना संकटानंतर पहिल्यांदा बजेट जाहीर करण्यात येणार असल्यामुळे सर्वच क्षेत्रातील कर्मचा-यांचे बजेट २०२१ कडे लक्ष लागले आहे़ यंदाच्या बजेटचे सादरीकरणेही दरवर्षीपेक्षा वेगळे असणार आहे.
कोरोनामुळे यंदाच्या बजेटमध्ये एक मोठा बदल होणार आहे. यंदा देशाचे बजेट लाल रंगाच्या कपड्यात नव्हे तर आॅनलाईन पद्धतीत सादर होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच आॅनलाइन पद्धतीने हे बजेट सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. यासाठी डिजीटलायजेशनची प्रक्रिया पूर्ण झाली असून, सर्व सदस्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. प्रश्न आणि त्याची उत्तरे आॅनलाईन पद्धतीने दिली जाणार आहेत.
मोबाईल अॅपही लाँच
– अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी युनियन बजेट अॅप लाँच केले आहे. ज्यामध्ये बजेट संदर्भात सर्व माहिती नागरिकांना मिळणार आहे. युनियन बजेट अॅपद्वारे स्मार्टफोन यूजर्स हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांमध्ये बजेट वाचू शकतात. सामान्य जनतेपर्यंत सर्व माहिती पोहचू शकेल हाच या मागचा उद्देश आहे.
– देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अॅपच्या माध्यमातून बजेट सादर होणार आहे. हे मोबाईल अॅप आर्थिक माहिती विभाग (डीईए) च्या नेतृत्वात नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) तयार केले आहे.
– आर्थिक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार अॅपला यूजर फ्रेंडली इंटरफेस असेल. यामध्ये १४ वेगळया केद्रींय बजेटच्या कागदपत्रांचा एक्सेस यूजर्सला मिळणार आहे. त्यामध्ये फायनेंशियल स्टेटमेंट, डिमांड फॉर ग्रांट्स आणि फायनेंस बिल देखील असणार आहे. हे सर्व कागदपत्र यूजर्सला डाउनलोड देखील करता येणार आहे.
सर्व कर्मचारी १० दिवसांसाठी क्वारंटाईन
दरवर्षीची बजेट पटलावर येण्याआधी हलवा करण्याची परंपरा देखील यंदा नुकतीच पार पडली. या सोहळ्यानंतर बजेटचे काम सुरू झाले आहे आणि सर्व कर्मचारी १० दिवसांसाठी नॉर्थ ब्लॉकमध्ये क्वारंटाइन झाले आहेत. बजेट तयार होत नाही तोपर्यंत या कर्मचाºयांना कोणालाही भेटण्याची परवानगी नसते.