17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeउद्योगजगतमारुती सुझुकीने परत मागवल्या तब्बल १ लाख ८१ हजार गाड्या

मारुती सुझुकीने परत मागवल्या तब्बल १ लाख ८१ हजार गाड्या

एकमत ऑनलाईन

मुंबई : मारुती सुझुकी १ लाख ८१ हजार गाड्या परत मागवणार आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने शुक्रवारी यासंदर्भात घोषणा केली. सियाझ, एर्टिगा, विटारा ब्रेझा, एस-क्रॉस आणि एक्सएल ६ च्या काही पेट्रोल व्हेरियंट्स परत मागवणार आहे. या सर्व मॉडेल्सच्या गाड्या ४ मे २०१८ ते २७ ऑक्टोबर २०२० दरम्यान तयार केलेल्या आहेत. या मॉडेल्सच्या १ लाख ८१ हजार ७५४ युनिट्समध्ये संभाव्य त्रुटींची तपासणी केली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. मारुतीने जागतिक स्तरावर रिकॉल मोहीम हाती घेतली असून या सर्व गाड्यांमध्ये सुरक्षेसंदर्भात त्रुटी असू शकतात, असेही म्हटले आहे.

ग्राहकांच्या हितासाठी, मारुती सुझुकीने मोटार जनरेटर युनिटची तपासणी करून मोफत रिप्लेसमेंट किंवा वाहने पूर्णपणे बदलून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्रुटी असलेल्या वाहन मालकांना मारुती सुझुकीच्या अधिकृत वर्कशॉप्समधून कळवण्यात येईल. शिवाय त्रुटी असलेल्या पार्टसची रिप्लेसमेंट करण्याचे काम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल. वर नमूद केलेल्या मॉडेल्सची वाहने ज्यांच्याकडे आहेत, त्यांनी ती पाण्यामध्ये चालवू नये आणि वाहनांमध्ये इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक भागांवर थेट पाण्याची फवारणी करणे टाळावे, अशी विनंती कंपनीने ग्राहकांना केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या