20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeउद्योगजगतमेटा, मायक्रोसॉफ्टने जुलैअखेर ३२ हजारांवर कामगारांना काढले

मेटा, मायक्रोसॉफ्टने जुलैअखेर ३२ हजारांवर कामगारांना काढले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगभरातील मंदीच्या भीतीने मोठ्या टेक फर्म मेटा प्लॅटफॉर्मने नोकरभरती आणि त्यानंतरच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया थांबवण्याची घोषणा केली आहे. उच्च चलनवाढ, रशिया आणि युक्रेन यांच्यातील प्रदीर्घ युद्ध, जागतिक पुरवठा साखळींचा अभाव, विशेषत: सेमीकंडक्टर चिप्स आणि जाहिरातींचा घसरलेला खर्च अशी अनेक जागतिक कारणे यामागे आहेत. मेटा, मायक्रोसॉफ्टमध्ये जवळपास ३२ हजार कर्मचा-यांना नोक-या गमवाव्या लागल्या.

मेटाने अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसारख्या मोठ्या टेक कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवत नियुक्ती प्रक्रिया गोठवली आहे. अनेक कर्मचा-यांना पिंक स्लिप्स देण्यास सुरुवात केली आहे. आम्हाला वाटले होते की आतापर्यंत अर्थव्यवस्था स्थिर होईल. पण आम्ही जे पाहत आहोत त्यावरून असे दिसत नाही. म्हणूनच आम्ही काही योजना बनवण्याचा विचार करत आहोत, असे मार्क झुकेरबर्गने साप्ताहिक प्रश्न-उत्तर सत्रादरम्यान आपल्या कर्मचा-यांना सांगितले.

मेटा बहुतेक टिमचे बजेट कमी करेल आणि कर्मचा-यांमधील बदलास कसे हँडल करायचे हे संबंधित टिम ठरवेल. या वर्षाच्या जूनमध्ये आधीच मेटाने इंजिनीअरची नियुक्ती ३० टक्क्यांनी कमी केली होती, असेही ते म्हणाले. जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख न्गोजी ओकोन्जो-इवेला म्हणाले की, अनेक संकटांमुळे जग मंदीच्या दिशेने जात आहे आणि विकासाला पुनरुज्जीवित करण्यासाठी धोरणे तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या वार्षिक सार्वजनिक मंचाला संबोधित करताना न्गोजी म्हणाले की, जग मंदीत आहे पण आपल्याला त्यातून बाहेर पडायचे आहे. आपल्याला पुन्हा वाढ करावी लागेल. या वर्षाच्या सुरुवातीपासून, सार्वजनिकरित्या व्यवहार केलेले स्टॉक्स डाउनट्रेंडवर सुरू झाले आहेत, ज्यामुळे कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत खराब कामगिरी झाली आहे.

कर्मचा-यांच्या संख्येत घट
क्रंचबेसच्या डेटानुसार मायक्रोसॉफ्ट आणि मेटासारख्या यूएस टेक क्षेत्रातील मोठ्या टेक कंपन्यांनी जुलैच्या अखेरीस ३२ हजारहून अधिक कर्मचा-यांना मोठ्या प्रमाणावर कामावरून काढून टाकले आहे. या कपातीमध्ये उबर, नेटफ्लिक्स आणि अनेक क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आणि कर्ज देणा-या कंपन्या आहेत. तसेच या डेटामध्ये यूएस-आधारित स्टार्टअप आणि सार्वजनिकपणे व्यापार करणा-या कंपन्यांचा समावेश केला असल्याचेही क्रंचबेसच्या अहवालात म्हटले आहे. यासह त्यांनी मोठ्या टीमसह अमेरिकेत असलेल्या क्लार्नासारख्या कंपन्यांचाही समावेश केला. तंत्रज्ञान क्षेत्रातील कोणतीही पुनर्प्राप्ती अत्यंत कठीण दिसत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या