22.7 C
Latur
Wednesday, August 12, 2020
Home उद्योगजगत कर्जावरील ईएमआयमध्ये आणखी सवलत?

कर्जावरील ईएमआयमध्ये आणखी सवलत?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाने जगभर थैमान घातले असून, या विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटात सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडूनही महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या काळात ईएमआयमध्ये तीन महिन्यांची सूट देण्याचा सल्ला आरबीआयने बँकांना दिला होता. त्यानुसार अनेक बँकांनी ईएमआय भरण्यास काहीशी सवलत दिली होती. आता पुन्हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ईएमआयवरील कर्ज कर्जफेड पुढे ढकलण्याला मुदतवाढ देण्याचे संकेत दिले आहेत.

कोरोना संक्रमणाचा आर्थिक परिणाम लक्षात घेता आरबीआयने मार्चमध्ये ईएमआयला तीन महिन्यांसाठी स्थगिती सुविधा प्रदान केली आहे. ही सुविधा मार्च ते ३१ मे या तीन महिन्यांसाठी लागू करण्यात आली. नंतर आरबीआयने ते तीन महिन्यांसाठी वाढवून ३१ आॅगस्टपर्यंत वाढविली. म्हणजेच एकूण ६ महिन्यांच्या मुदतवाढीची सुविधा देण्यात आली आहे. फिक्कीच्या कार्यक्रमात अर्थमंत्री सितारामन यांनी ही माहिती दिली.

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात कर्जाचे पुनर्गठण आवश्यक आहे. आरबीआयकडून स्थगिती वाढविण्यावरही चर्चा आहे. परंतु रेटिंग एजन्सींनी कर्ज स्थगितपणा वाढविण्याविषयी इशारा दिला असून, ग्लोबल रेटिंग एजन्सी स्टँडर्ड अ‍ॅण्ड पुअर्सने एनपीएवाढीचा अंदाज वर्तवला आहे.

Read More  सुप्रीम कोर्ट : क्वारंटाईनची सुटी समजून वेतन कापता येणार नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,143FansLike
101FollowersFollow