24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeउद्योगजगतनव्या उद्योगांसाठी ४० हजार एकरपेक्षा जास्त जमीन राखीव ठेवणार!

नव्या उद्योगांसाठी ४० हजार एकरपेक्षा जास्त जमीन राखीव ठेवणार!

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

एकमत ऑनलाईन

मुंबई: वृत्तसंस्था
लॉकडाउननंतर राज्यात जे नवे उद्योग येऊ इच्छितात त्यांच्यासाठी आपण ४० हजार एकरपेक्षा जास्त जमीन राखून ठेवत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि़ १८ मेरोजी सोमवारी केली. याद्वारे त्यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी नव्या उद्योगांना राज्यात येण्याचे आवाहन केले आहे.

ठाकरे म्हणाले की, जगात सर्वकाही ठप्प झालेल असताना उद्या आपल्याला भरारी घ्यायची आहे. त्याकडे आपण आजिबात मागे पुढे पाहणार नाही. आमच्या शासनाने सुरु केलेल्या नव्या योजना आम्ही आमलात आणणार म्हणजे आणणारच. नवीन उद्योग आणण्यासाठी सध्या देशात स्पर्धा आहे. कोण काय नवे देते याकडे सर्वांच लक्ष आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात आपण ४० हजार एकरपेक्षा जास्त जमीन नवीन उद्योगधंद्यांसाठी राखून ठेवत आहोत. त्याचबरोबर जे नवे उद्योजक परदेशातून राज्यात येतील किंवा आपलेच काही उद्योजक नवे उद्योग स्थापन करण्यासाठी पुढे येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे.

हे उद्योजक जर ग्रीन उद्योग सुरु करणार असतील तर त्यांना प्रदुषण होणार नाही या अटीशिवाय आपण कुठल्याही अटीतटी ठेवणार नाही. नवीन उद्योजकांनो या महाराष्ट्रामध्ये या असे आवाहन यावेळी त्यांनी केले. त्याचबरोबर पुढचे काही दिवस हे नवे उद्योजक येणार असतील आणि त्यांना जमीन विकत घ्यायला परवडणार नसेल तरीही हरकत नाही. तुम्ही या तुम्हाला आम्ही भाडेतत्वार जमीन उपलब्ध करुन देऊ. उद्योगांसाठीच्या मुलभूत सुविधा तुम्हाला देतो. अटीतटीचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही. या राज्यात नवे उद्योग पर्व आपण सुरु करु, अशी सादही मुख्यमंत्र्यांनी नव्या उद्योजकांना घातली आहे.

Read More  आदित्यनाथ यांनी मान्य केली प्रियांकांची विनंती

ग्रीन झोन करोना विरहीत ठेवणे हे मोठे आव्हान
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ग्रीन झोन आपल्याला कोरोनामुक्त ठेवायचा आहे. तसेच रेड झोनचे लवकरात लवकर ग्रीन झोनमध्ये रुपांतर करायचे आहे. अनेक ठिकाणी कामगारांची उणीव आहे. कारण अनेक कामगार निघून गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील भुमिपुत्रांना माझे आवाहन आहे की, महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी जिथे ग्रीन झोन आहेत तिथे तुम्ही आता बाहेर पडले पाहिजे. या उद्योगांना जर मनुष्यबळ कमी पडत असेल तर मोदींच्या भाषेत आत्मनिर्भत होत पुढे या इथे तुमची खºया अर्थाने गरज आहे.

Read More  रुग्ण सापडला तरीही बेफिकिर!

मोदींच्या भाषेत आत्मनिर्भर होण्यासाठी महाराष्ट्राने पुढे यावे
मोदींच्या भाषेत महाराष्ट्र आत्मनिर्भर करण्यासाठी आता ग्रीन झोनमधल्या लोकांनी पुढे यावे. इतके दिवस तुम्ही महाराष्ट्र वाचवण्यासाठी घरात राहिलात आणि कोरोनाशी लढा दिला. आता जे उद्योग सुरु होत आहेत़ त्यासाठी मनुष्यबळ कमी पडल्यास ग्रीन झोनमधल्या माणसांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे़ सोशल मीडियाच्या आधारे त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी मोदींच्या भाषेत महाराष्ट्र आत्मनिर्मभर करायचा असेल तर ग्रीन झोन मधल्या लोकांनी पुढे यावे, असे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या