नवी दिल्ली : भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरलने ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टला नोटीस पाठवली आहे. ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टने ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट-१०४० चे उल्लंघन केल्याबद्दल ही नोटीस पाठवली आहे.
याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसह सुमारे २० कंपन्यांना ही नोटीस दिली. या सर्व कंपन्या ऑनलाइन औषधे विक्री करतात. गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयाने औषधांच्या ऑनलाइन विक्रीवर बंदी घातली आहे.